घरमुंबईबाप्पाच्या मंदिराला सोन्याचा दरवाजा, सोन्याचा घुमट

बाप्पाच्या मंदिराला सोन्याचा दरवाजा, सोन्याचा घुमट

Subscribe

सिद्धीविनायकाला भक्ताकडून तब्बल 35 किलो सोने दान

लाखो मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचा लवकरच देशातील सगळ्यात श्रीमंत मंदिराच्या यादीमध्ये समावेश होणार आहे. मोठ्या नेत्यांपासून सेलिब्रिटी बाप्पाच्या चरणी लीन होतात. अशाच एका भक्ताने सिद्धीविनायकाच्या चरणी तब्बल 35 किलो सोने दान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धीविनायकाचे मंदिर सिंदूर लेपनासाठी बंद होते.

या दरम्यान नवस पूर्ण झालेल्या एका भाविकाने विघ्नहर्त्याच्या चरणी 35 किलो सोने दान केले आहे. या सोन्याची किंमत 14 कोटींच्या घरात आहे. गणपती बाप्पाच्या चरणी एवढे सोने चढवणार्‍या भक्ताची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. भक्ताने दिलेल्या या सोन्याच्या दानातून मंदिराचा गाभारा, घुमट, दरवाजा यासह इतर गोष्टींना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहेत. बाप्पाचा घुमट हा सोन्याने मढवण्यात आला आहे. त्यासोबतच दरवाजेसुद्धा सोन्याने मढवण्यात आले आहेत.

- Advertisement -

येत्या 28 जानेवारीला माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होतो असे बोलले जाते. या निमित्ताने 15 जानेवारीपासून पाच दिवस शेंदूर लेपणासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. ते आज (20 जानेवारी) उघडण्यात आले. त्यानंतर रितसर पूजा आणि विधी करुन बाप्पाला आरसा दाखवण्यात आला. यानंतर भाविकांसाठी दर्शनाकरिता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -