घरमुंबईऊर्जा विभाग, एमएमआरडीएत अधिकारी रूजू

ऊर्जा विभाग, एमएमआरडीएत अधिकारी रूजू

Subscribe

महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत सनदी अधिकार्‍यांची झालेली खांदेपालटीनंतर आज ऊर्जा विभाग तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात अधिकार्‍यांनी पदभार स्विकारला. ऊर्जा विभागात महावितरण आणि महानिर्मिती याठिकाणी नवीन अधिकारी रूजू झाले. तर एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून अधिकारी रूजू झाले.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक असलेले संजीव कुमार यांनी आपल्याकडे असलेल्या पदाच्या जबाबदार्‍या हस्तांतरीत केल्या. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी आता ऊर्जाविभागाचे प्रधान सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमारगुप्ता यांच्याकडे आली आहे. तर महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी ही शैला ए यांच्याकडे त्यांनी सोपावली.

- Advertisement -

ग्राहकाला विश्वासात घेऊन जनतेशी संबंधितकामाच्यासोप्या पद्धती विकसित केल्यास प्रत्येकयोजना यशस्वी होऊ शकते.यासर्व बाबी महावितरणमधील प्रत्येकअधिकारीव कर्मचारी यांच्यासहकार्याने राबवता आल्या.यामुळेवीज क्षेत्रात अनेक सकारात्मक बदलकरता आले. म्हणूनच महावितरणमध्ये काम करणे हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता.’ अशाभावना मावळते महावितरणचेअध्यक्ष व व्यवस्थापकीयसंचालक संजीव कुमार यांनी व्यक्त केल्या.

संजीव कुमार यांची नुकतीचराज्याच्या विक्रीकर विभागाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यानिमित्ताने आयोजितनिरोप समारंभास उत्तर देताना ते बोलत होते.

- Advertisement -

एमएमआरडीएमध्ये डॉ के एच गोविंदराज
एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ के एच गोविंदराज यांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांनी संजय खंदारे यांच्याकडून एमएमआरडीएतील पदाची जबाबदारी स्विकारली. खंदारे यांची एमएमआरडीएमध्ये ऑक्टोबर २०१५ मध्ये नेमणुक करण्यात आली होती. त्यांच्याकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मोनोरेल, आयटीएस यासारखे मोठे प्रकल्प होते. तर गोविंदराज यांनी याआधी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागात प्रधान सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्याआधी गोविंदराज यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड आणि सांगली जिल्हा परिषद अशी जबाबदारी सांभाळली होती. कोल्हापुर महापालिकेचे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी सोलापूर अशा जबाबदार्‍याही त्यांनी हाताळल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -