घरमुंबईKapil Patil : "समाजवादी गणराज्य पार्टी"; कपिल पाटील यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

Kapil Patil : “समाजवादी गणराज्य पार्टी”; कपिल पाटील यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

Subscribe

मुंबई : जनता दल युनायटेडला नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीएमध्ये सामील झाल्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मात्र नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या जेडीयू पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचे समजते. अशातच महाराष्ट्रातील शिक्षक आमदार आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील यांनी जेडीयूला सोडचिट्टी देत नवीन पक्षाची स्थापना केली आहे. “समाजवादी गणराज्य पार्टी” असे त्यांच्या पक्षाचं नाव असून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या पक्षाचं नामकरण केले आहे. (Socialist Republic Party New party announcement by Kapil Patil)

हेही वाचा – BJP : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या ‘या’ नेत्याची माघार; विरोधकांनी साधला निशाणा

- Advertisement -

आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आणि जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते नाराज होते. पुरोगामी शक्तींनी भाजपसोबत जायला नको, असं त्याचं मत आहे. त्यामुळेच त्यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या राजकीय भूमिकेची घोषणा होणार आहे. ‘समाजवादी ऐक्याचा धम्मघोष, समाजवादी गणराज्याचा संकल्प,’ असा नारा देत आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धारावीत संयुक्त समाजवादी संमेलन होणार आहे. राज्याचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संमेलनाला संबोधित करणार आहेत. राज्यभरातील समाजवादी जनता परिवारातले नेते, कार्यकर्ते, जन संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने त्यात सामील होत आहेत.

हेही वाचा – Uddhav Thackeray : माजवादी विरुद्ध समाजवादी लढाई; ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल

- Advertisement -

कपिल पाटील सलग 3 वेळा विधान परिषदेत

दरम्यान, कपिल पाटील हे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील एकमेव समाजवादी आमदार आहेत. इतकचं नाही तर ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी ट्रस्टीदेखील आहेत. समाजवादी नेता बापूसाहेब काळदाते यांच्यानंतर समाजवादी आंदोलनातील एका कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान देण्यात आला आहे. कपिल पाटील सलग 3 वेळा महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई शिक्षकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. शिक्षण आणि शिक्षकांच्या अधिकारांसाठी ते विधान परिषदेत नेहमी आवाज उठवताना दिसतात. त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे ओबीसी आणि मंडल आयोग आंदोलनात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -