घरमहाराष्ट्रपुणेRaj Thackeray : बैठकीसाठी म्हणून गेले; पण राज ठाकरे बैठक न घेताच...

Raj Thackeray : बैठकीसाठी म्हणून गेले; पण राज ठाकरे बैठक न घेताच परतले

Subscribe

पुणे : पुण्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनिमित्त राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील नवी पेठेतील पक्ष कार्यालयात दुपारी दोन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीला पदाधिकारी उशीरा पोहचल्याने राज ठाकरेंना राग अनावर झाला आणि ते तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले. (Went for a meeting But Raj Thackeray returned without meeting)

हेही वाचा – Sunetra Pawar : “यंदा भाकरी फिरणार अन्…”; कार्यकर्त्यांच्या स्टेटसची जोरदार चर्चा

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठका होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. सुरुवातीला पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती, मात्र नंतर या बैठकीची वेळ बदलून दुपारी 2 वाजता करण्यात आली. राज ठाकरे विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत  लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार होते. त्यामुळे या सर्वांना दुपारी दोन ते सव्वा दोन दरम्यान, पक्ष कार्यालयात पोहचणे अपेक्षित होते. राज ठाकरे दुपारी सव्वा दोन वाजता पक्ष कार्यालयात पोहचले. मात्र यावेळी कार्यालयात मुख्य पदाधिकारी आणि विभाग प्रमुख पोहचले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांनी तासभर सर्वांची वाट बघितली, मात्र तोपर्यंत राग अनावर झाला होता. त्यामुळे ते बैठक सोडून मुंबईकडे रवाना झाले.

हेही वाचा – Kapil Patil : कपिल पाटलांची वेगळी चूल, जेडीयूची साथ सोडली; नितीश कुमारांना धक्का

- Advertisement -

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची काय रचना असेल? निवडणूक कशी पार पाडणार? यासंदर्भात मनसेच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी राज ठाकरे पक्ष कार्यालयात पोहचले. राज ठाकरे आल्याचे समजताच  पदाधिकारी आणि विभाग प्रमुखांची तारांबळ उडाली. शहरातील विविध भागातील पदाधिकारी आणि विभाग प्रमुख कार्यालयापर्यंत कसेबसे पोहचले. मात्र पदाधिकारी आणि विभाग प्रमुख वेळेवर न आल्याने राज ठाकरे निघून गेले. त्यामुळे बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात कोणतीच चर्चा झाली नाही. याशिवाय राज ठाकरे यांनी कोणाशीही संवाद न साधता तडकाफडकी कार्यालयातून बाहेर आले आणि मुंबईकडे रवाना झाले. राज ठाकरे अशापद्धतीने निघून गेल्यामुळे आता पुढची बैठक होणार का? असा प्रश्न पदाधिकारी आणि विभाग प्रमुखांना पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -