घरमुंबईSpecial Child : विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी प्रारंभिक उपचार - पुनर्वसन केंद्राचे...

Special Child : विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी प्रारंभिक उपचार – पुनर्वसन केंद्राचे CM यांच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

या उपचार आणि पुनर्वसन केंद्र (ई. आय. आर. सी. सी.) ओझोन बिझ  सेंटर, बी व सी विंग, बेलासिस मार्ग, नागपाडा, मुंबई सेंट्रल येथे स्थित असून सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत तर शनिवार सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत हे केंद्र नियमितपणे सुरू राहणार आहे. 

मुंबई : विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी ‘प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र’ची सुविधा बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय अंतर्गत देण्यात येणार आहे. या केंद्राचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार (24 डिसेंबर ) सकाळी 8 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नागपाडा वतीने बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय अंतर्गत ही सुविधान मुलांना देण्यात येणार आहे.
या उपचार आणि पुनर्वसन केंद्र (ई. आय. आर. सी. सी.) ओझोन बिझ  सेंटर, बी व सी विंग, बेलासिस मार्ग, नागपाडा, मुंबई सेंट्रल येथे स्थित असून सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत तर शनिवार सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत हे केंद्र नियमितपणे सुरू राहणार आहे.
‘प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र’ विषयी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल म्हणाले, मुलांची सर्वांगीण काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखांची एकत्रित, अशी सुविधा या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांना अत्याधुनिक, सहज उपलब्ध, परवडणारी आणि एकात्मिक पुनर्वसन सेवा एका छताखाली देण्याचे ध्येय या केंद्राच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. ह्या मुलांच्या वैयक्तिक गरजांमधील  फरक आणि त्यांच्या  शिकण्याच्या शैलीनुसार बनवलेल्या बहुविद्याशाखीय सेवा प्रदान करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन वचनबद्ध आहे, असे डॉ. चहल यांनी नमूद केले.

जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना सक्षम बनवू – डॉ. शिंदे

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, सदर केंद्र कार्यान्वयित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून वेगाने कामकाज करण्यात आले. हे केंद्र कार्यान्वयित झाल्यानंतर विशेष गरजा असलेल्या मुलांमध्ये कार्यक्षमतेची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना सक्षम बनवू, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

उपचार व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून कुटुंबांना लवकर – डॉ. मेढेकर 

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर म्हणाले की, विशेष गरजा असलेल्या मुलांच्या प्रारंभिक उपचार व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून कुटुंबांना लवकर आणि वेळेवर आधार देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणार – डॉ शहा

या केंद्राच्या डॉ. हिनल शहा यांनी सांगितले की, केंद्राच्या माध्यमातून कान, नाक, घसा विभाग, नेत्रशल्यचिकित्सा विभाग, अस्थिव्यंगचिकित्सा विभाग, बालरोग चिकित्सा विभाग, मनोविकृती चिकित्सा विभाग, व्यवसायोपचार स्कूल आणि सेंटर,  फिजिओथेरपी स्कूल आणि सेंटर,  श्रवणशास्त्र व वाक् विकृतीउपचार विभाग यासारख्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर नायर रुग्णालय  दंत महाविद्यालयाच्या माध्यमातून बाल दंत विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. सुरभी राठी यांनी नमूद केले की, या केंद्राच्या माध्यमातून महानगरपालिकेने शास्त्रसिद्ध उपचार आणि प्रशिक्षण देणारे चिकित्सालयीन उत्कृष्टतेचे केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांच्या कुटुंबांना लवकर आणि वेळेवर आधार देऊन त्यांच्यासाठी आशेचा किरण बनण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Divorce : लग्नाला 8 वर्षे झाली तरी आमच्यात पती-पत्नीसारखे संबंध नाही! खासदाराच्या विनंतीवरुन घटस्फोट मंजूर

दिग्गज नेत्यांची हजेरी 

या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, आमदार यामिनी यशवंत जाधव, आमदार सुनिल शिंदे, आमदार राजहंस सिंह, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -