घरदेश-विदेशRam Mandir: '22 जानेवारी' स्वातंत्र्य दिना इतकाच महत्त्वाचा दिवस; चंपत राय यांचं मोठं विधान

Ram Mandir: ’22 जानेवारी’ स्वातंत्र्य दिना इतकाच महत्त्वाचा दिवस; चंपत राय यांचं मोठं विधान

Subscribe

राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, 22 जानेवारी 2024 हा दिवस 15 ऑगस्ट 1947 इतकाच महत्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र चंपत राय यांनी केलेल्या विधानामुळे विरोधी पक्षांकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे.

अयोध्या : पुढील वर्षी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोधा येथे रामल्लाची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या उत्सवाची भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे आणि कोणाला बोलावू नये याची चर्चा रंगलेली असतानाच राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Ram Mandir January 22 is as important a day as Independence Day A great statement by Champat Rai)

राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, 22 जानेवारी 2024 हा दिवस 15 ऑगस्ट 1947 इतकाच महत्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र चंपत राय यांनी केलेल्या विधानामुळे विरोधी पक्षांकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे. कारण, राय यांनी थेट स्वातंत्र्य दिनाशी राम मंदिर उद्घाटनाशी तुलना केल्यानं तसेच याला धार्मिक स्वरुप तसेच कारगिल युद्धाशी तुलना केल्यानं देशभक्तीशी जोडल्यानं यावरुन वाद निर्माण होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा : OSD List : मुख्यमंत्री शिंदेंना राज्याबाहेरील उमेदवारांचा मोह; 9 पैकी ‘इतके’ अधिकारी परप्रांतीय

- Advertisement -

कोण आहे चंपत राय?

चंपत राय हे उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1946 मध्ये रामेश्वर प्रसाद बन्सल यांच्या कुटुंबात झाला. राय यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता आणि ते त्यात सामील झाले. चंपत राय यांनी संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि ते संघटनेचे प्रचारक होते. राय यांनी रसायनशास्त्र विषयाचे शिक्षण घेतले. आणि बिजनौर जिल्ह्यातील धामपूर येथे असलेल्या आश्रम पदवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केले.

हेही वाचा : NCP : आगामी निवडणूक कमळावर लढणार नाही; दादा गटाची भूमिका

2020 मध्ये झाली रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस निवड

चंपत राय हे गेल्या तीन वर्षांपासून अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुख्य चेहरा बनले आहेत. मंदिराच्या बांधकामाशी संबंधित प्रत्येक अधिकृत माहिती चंपत राय यांच्यामार्फतच शेअर केली जाते. चंपत राय हे प्रदीर्घ काळ विश्व हिंदू परिषदेशी संबंधित होते आणि 2020 मध्ये त्यांना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस बनवण्यात आले. राम मंदिर प्रकरणाच्या सुनावणीवेळी मुख्य वकील आणि पक्षकार राहिलेल्या चंपत राय यांच्यासाठी ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची होती. कारण ते या चळवळीत बराच काळ सक्रिय होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -