घरमुंबईबहुमत चाचणीसाठी आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन

बहुमत चाचणीसाठी आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन

Subscribe

दिलीप वळसे-पाटील हंगामी अध्यक्ष

महाराष्ट्रातल्या नव्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी शनिवारी होणार आहे. त्यासाठी आघाडी सरकार सज्ज झाले आहे. बहुमच चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून दिलीप वळसे-पाटील यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता हे अधिवेशन सुरू होणार आहे.हे अधिवेशन शनिवारी आणि रविवारीदेखील असणार आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी सरकार स्थापनेचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करायला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. ते प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ३० नोव्हेंबरची मुदत कमी करत २७ नोव्हेंबर रोजी फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले होते.

- Advertisement -

त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, बहुमत नसल्याने फडणवीस यांनी राजीनामा दिला होता. राज्यपालांनी आघाडी सरकारला येत्या ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीने फार वेळ न दवडता ताबडतोब विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे सत्र होणार आहे. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. आता त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असली तरी विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यास वळसे-पाटील यांचेच नाव अध्यक्षपदासाठी निश्चित होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -