घरमुंबईहिरकणीला दे धक्का!

हिरकणीला दे धक्का!

Subscribe

एसटीच्या हिरकणी बसेस अखेरचा श्वास घेत आहेत. 1983 मध्ये एसटीच्या ताफ्यात आलेल्या या बसेस आता मृत्युपंथास लागल्या आहेत. एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयाच्या बस स्थानकावरच हिरकणीला प्रवाशांसह एसटी कर्मचारी धक्का मारत असलेले हे चित्र वारंवार दिसू लागले आहे. सध्या राज्यात 752 हिरकणी गाड्या आहे. त्यापैकी बहुतेक गाड्यांची स्थिती ‘दे धक्का!’अशी आहे. तर काही गाड्या भंगारात निघालेल्या आहेत.

एसटी महामंडळ आर्थिक डबघाईस आले असताना राज्य शासनाने त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केलेले आहे. मागील तीन वर्षांपासून नवीन बसगाड्या मिळत नसल्याने भंगार बसेस रस्त्यावर काढण्याची वेळ एसटीवर वारंवार येत आहे. मात्र या बसेस आगरातच बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. एसटीकडून वेळीच देखभाल होत नसल्यामुळे बसेस भंगारात निघण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा बसेसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आह

- Advertisement -

एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारातील एम.एच.२० बी.एल.३२३५ क्रमांकाची हिरकणी बस दापोलीला दुपारी ३ वाजता जाण्यासाठी निघाली होती. मात्र अचानक या बसमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने ती बंद पडली. तेव्हा चालक, वाहकाने प्रवाशांच्या मदतीने बसला धक्का देऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न केला. ती बस सुरू तर झालीच नाही उलट प्रवाशांसह एसटी कर्मचार्‍यांचा चांगलाचा घाम निघाला.

अखेर ती बस आगरातच ठेऊन नव्या बसची व्यवस्था एसटी प्रशासनाला करावी लागली. अशाप्रकारे एसटी बसेस् बंद पडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवाशांना एसटीचा प्रवास डोकेदु:खी ठरू लागला आहे. नवीन बस गाड्यांची मागणी सतत करण्यात येत असूनसुद्धा त्याकडे एसटी महामंडळ त्याकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

राज्यात 752 हिरकणी गाड्या
राज्य शासनाकडून एसटीला नवीन गाड्या खरेदी करून दिल्या जाणार होत्या. तसेच एसटी महामंडळ स्वत: काही बसेस बांधणार होते. मात्र, एसटीच्या ताफ्यात अद्याप एकही नवी गाडी आलेली नाही. त्यामुळे एसटीच्या भंगार बस प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. हिरकणीची सेवासुद्धा डबघाईस आली असून, गावखेड्यांपर्यंत पोहचणारी हिरकणी आता खिळखिळी झाली आहे. राज्यात 752 हिरकणी गाड्या आहेत. मात्र त्यापैकी मोजक्याच गाड्या रस्त्यावर धावताना दिसून येत आहे.

नियोजन कोलमडले
मुंबई आगारात नवीन बसेस् येण्यास ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेस्चे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. जुन्या बसेस्मुळे काही फेर्‍या रद्द करण्याचा प्रसंग आगार व्यवस्थापकावर येत असल्याची माहिती आहे. मुंबई – नारायणगांव, मुंबई – पाली, मुंबई – हैद्राबाद, मुंबई- विजयापूर, मुंबई- जमखंडी सारखे अनेक एसटीच्या मार्ग बंद असल्याने मोठ्या प्रमाणात एसटीचा महसूल बुडत आहे. उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईत एसटी महामंडळ अतिरिक्त बसेस सोडते, मात्र यावर्षी एसटी महामंडळाकडे वाहक-चालक नसल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -