घरमुंबईविद्यापीठाचा तुटीचा अर्थसंकल्प

विद्यापीठाचा तुटीचा अर्थसंकल्प

Subscribe

68.81 कोटीची तुट; बिगर सदस्याच्या उपस्थितीवरून सदस्य आक्रमक

दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाने शिलकीचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर यंदा पुन्हा एकदा तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ विद्यापीठ प्रशासनावर आली. गुरुवारी विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत रात्री उशीरा 68.81 कोटीचा तूटीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. विद्यापीठाचे मॅनेजमेंट काऊन्सिलचे सदस्य दीपक मुकादम यांच्यामार्फत हा अर्थसंकल्प मांडून कुलगुरू नवा पायंडा घालू इच्छित होते. मात्र त्यांच्या उपस्थितीबाबत दोन्ही दिवस सिनेट सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्यावर बैठकीतून काढता पाय घेण्याची वेळ आली.

जुन्या की नव्या परिनियमानुसार सिनेटचा कारभार चालावायचा, बिगर सिनेट सदस्याची उपस्थिती, मराठीचा वापर अशा मुद्दयांने बुधवारी गाजलेल्या सभेत अखेर गुरुवारी 695 कोटींचा अर्थसंकल्प वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ अजय भामरे यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, वित्त व लेखा अधिकारी संजय शहा यांच्या उपस्थित सिनेट सदस्यांसमोर सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ६८.८१ कोटीची तृट दाखविण्यात आली आहे. नाविण्यपूर्ण योजनांसह विकासकामांना प्राधान्य देत तीन स्वतंत्र भागामध्ये या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये परिरक्षण आणि विकास, स्वतंत्र प्रकल्प आणि सहयोगी उपक्रमासाठी अनुदान अशा बाबींचा समावेश आहे.

- Advertisement -

आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी विद्यापीठाला ११ लाखांची देणगी मिळाली. संशोधनवृत्तीला चालना देऊन संशोधन संस्कृती रुजविण्यासाठी संशोधन करुन प्रकाशनासाठीचा पुरस्कार, संशोधनासाठी नविन उपक्रम राबविण्यासाठी नेतृत्व करणे, आंतरराष्ट्रीय सहभाग कक्ष, इतर विद्यापीठातील उत्कृष्ट कामाचा अभ्यास करण्यासाठी शिक्षक, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा सदस्य यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा, विद्यापीठ कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, संशोधनात्मक काम करणारे शिक्षक आणि अधिसभा सदस्यांना पारितोषिके, सहयोगी प्राध्यापक आणि प्रा. बाळ आपटे अध्यासन केंद्र या अशा नाविण्यपूर्ण बाबींवर आधारीत विशेष अर्थसंकल्पीय तरतूदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देत विद्यार्थी केंद्रीत अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

याबरोबरच २०१९- २०२० या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आला असून यामध्ये विद्यार्थी भवन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत, तृतीय आणि चतूर्थश्रेणी कर्मचारी वसाहत, संग्रहालय कॉम्प्लेक्स इमारत १०० क्षमतेचे अतिथीगृह आणि ५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह अशा नियोजित बांधकामाना प्राधान्य देण्यात आले आहे.

- Advertisement -

२०१९-२०२० मधील नवीन उपक्रम
संशोधकांना मानधन – ३ कोटी २५ लाख
व्हाईस चान्सलर फेलोज – ९० लाख
इन्क्युबेशन सेंटर – १ कोटी ५० लाख
महिलांसाठी कल्याणकारी योजना – १ कोटी ५० लाख
जगातील १०० विद्यापीठात समाविष्ट होणे – १५ लाख
आंतरराष्ट्रीय सहभाग कक्ष – ५ लाख
शिक्षक, व्यवस्थापन, विद्या परिषद व अधिसभा सदस्य यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा- ६ लाख
विद्यापीठ कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, संशोधनात्मक काम करणारे शिक्षक आणि अधिसभा सदस्यांना पारितोषिके – ४० लाख
सहयोगी प्राध्यापक- १ कोटी
प्रा. बाळ आपटे अध्यासन केंद्र- १ कोटी

२०१९-२०२० मधील नियोजित बांधकामे-
विद्यार्थी भवन- २ कोटी
शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत- ४ कोटी
संग्रहालय कॉम्पलेक्स इमारत- ३ कोटी ५० लाख
१०० क्षमतेचे अतिथीगृह-४ कोटी
५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह- ४ कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -