घरमुंबईएसटीला आदिवासी उमेदवारांची प्रतीक्षा

एसटीला आदिवासी उमेदवारांची प्रतीक्षा

Subscribe

एसटी महामंडळाने नुकतेच ८ हजार २२ चालक तथा वाहकपदांची भरती प्रक्रिया सुरू केली. मात्र या भरतीत आदिवासी युवक-युवतींसाठी असलेल्या राखीव जागा भरून काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची प्रतीक्षा करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे. मात्र त्यासाठी महामंडळ स्वतःहून प्रयत्न करीत आहे. या भरतीची आदिवासी उमेदवारांना माहिती मिळावी व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वृत्तपत्राद्वारे, बसस्थानकावर फलक, उद्घोषणा व दृकश्राव्य माध्यामातून सदर भरती प्रक्रियेविषयी जागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आदिवासींसाठी महाराष्ट्र राज्यात हा पहिलाच प्रयत्न असल्याने सर्व स्तरातून एसटी महामंडळाचे कौतुक होत आहे.

तब्बल ८ हजार २२ चालक तथा वाहक पदांची भरती प्रक्रिया सुरू करून एसटी महामंडळाने राज्य शासनाच्या अगोदर बाजी मारली आहे. परंतु आदिवासी युवक-युवतींसाठी असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची प्रतीक्षा करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे.१५ फेब्रुवारीला अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसह एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातींकरिता ६८५ पदे आरक्षित आहेत. मात्र, तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाने आदिवासी युवक-युवतींना प्रोत्साहित करण्यासाठी  वृत्तपत्राद्वारे, बसस्थानकावर फलक, उद्घोषणा व दृकश्राव्य  माध्यमाद्वारे सादर भरती प्रक्रियेविषयी जागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या बरोबरच शासकीय आदिवासी विभागांना पत्र लिहून त्यांच्याद्वारे आदिवासी उमेदवारांपर्यंत भरतीची जाहिरात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज अनुसूचित जमातीच्या जागा कित्येक वर्षे रिक्त आहेत, त्यासाठी महामंडळ स्वतःहून प्रयत्न करीत आहे. महामंडळाच्या या प्रयत्नांचे आदिवासी विभागाकडून कौतुक होत आहे. इतर शासकीय विभागांनी महामंडळाचे अनुकरण करावे,असा उपरोधिक सल्लासुध्दा दिला जात आहे.

- Advertisement -

आदिवासींच्या विकासासाठी एसटी अग्रगण्य                                                                                          8022 पदासाठी आज अखेर ३५६१७ अर्ज आलेत, त्यापैकी अनुसूचित जमातीच्या ६८५ पदांसाठी फक्त १ हजार ७७२ अर्ज आले आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेत आदिवासी युवक युवतींची संख्या वाढवावी, यासाठी परिवहन मंत्र्यांनी कंबर कसली आहे. यापूर्वीसुध्दा नक्षलग्रस्त आदिवासी  भागातील  आदिवासी युवक-युवती यांना एसटीत नोकरी मिळावी यासाठीही एसटीने पुढाकार घेतला होता. आदिवासी समाजाला नेहमीच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एसटी महामंडळ पुढाकार घेतला आहे.

एसटीची मेगा भरती                                                                                                                     दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यातील मेगा भरती काढल्यानंतर एसटी महामंडळाने उर्वरित नऊ जिल्ह्यांसाठी 3606 चालक तथा वाहक पदासाठी जाहिरात काढली आहे. सदर जाहिरात 6 फेब्रुवारी 2019 पासून एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मिळून तब्बल 8022 चालक तथा वाहक पदांची भरती करण्यासाठी जाहिरात एसटी महामंडळाकडून प्रसारित करण्यात आली आहे.अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली  व वर्धा  अशा नऊ जिल्ह्यांमध्ये सदर भरती होणार आहे.

- Advertisement -

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -