घरमुंबई10 ऑक्टोबरपासून मुंबईतील रस्त्यांची कामे होणार सुरू

10 ऑक्टोबरपासून मुंबईतील रस्त्यांची कामे होणार सुरू

Subscribe

शहरातील विकासकामे पावसाळ्यानंतर सुरु केली जातात. मनपाकडून केल्या जाणार्‍या विकासकामात मुंबईतील रस्त्यांच्या कामाला विशेष महत्व असते. नागरिकांना चांगले रस्ते देता यावेत म्हणून नवे रस्ते बनवताना व रस्त्यांची दुरुस्ती करताना वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. परवानगी मिळवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच परवानगी मिळणार असल्याने येत्या 10 ऑक्टोबरपासून रस्त्यांची कामे सुरु केली जातील, अशी माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.

पालिकेने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील 507.62 किमी लांबीच्या रस्त्यांची 1 हजार 343 कामे ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पावसाळ्यामुळे थांबवण्यात आलेल्या 719 आणि नवीन 1 हजार 343 रस्त्यांची व जंक्शनच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे. 507.62 किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामांमध्ये नुकत्याच काढण्यात आलेल्या निविदांमधील 202.31 किमी लांबीच्या 624 रस्त्यांचा समावेश आहे. या कामांमध्ये शहर भागातील 46.16 किमी लांबीच्या 199 रस्ते कामांचा समावेश आहे, तर पूर्व उपनगरातील 47.89 किमी लांबीच्या 155 रस्ते आणि पश्चिम उपनगरातील 108.26 किमी लांबीचे 270 रस्त्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

उर्वरित 305.08 किमी लांबीच्या रस्त्यांची 719 कामे ही पावसाळ्यामुळे थांबवण्यात होती. 1 लाख 31 हजार 8 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या जंक्शनच्या कामांचा समावेश आहे. मागील दोन वर्षांपासून म्हणजेच 2016 पासून 31 मे 2018 पर्यंत 552.71 किमी लांबीच्या रस्त्यांची आणि 2 लाख 88 हजार 278 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या जंक्शनची कामे करण्यात आली आहेत. पावसाळ्यामुळे थांबवण्यात आलेल्या कामांमध्ये 305.08 किमी लांबीच्या 719 रस्त्यांचा समावेश आहे.

यामधील 238.45 किमी लांबीचे रस्ते हे ’प्रकल्प रस्ते’ या वर्गवारीतील आहेत. तर जे रस्ते पूर्णपणे नव्याने करण्यात येणार आहेत, अशा रस्त्यांचा समावेश ’प्रकल्प रस्ते’ या वर्गवारीत करण्यात येतील. या व्यतिरिक्त ’प्राधान्यक्रम 2’ या वर्गवारीतील राहिलेल्या 7.71 किमी लांबीच्या रस्त्यांची व प्राधान्यक्रम 3 अंतर्गत 58.92 किमी लांबीच्या रस्त्यांची कामेही हाती घेतली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -