घरमुंबईमुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद झाल्याने ठाणेकरांनाही दिलासा

मुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद झाल्याने ठाणेकरांनाही दिलासा

Subscribe

मुलुंडचे डंपिंग ग्राऊंड आजपासून शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांनाही दिलासा मिळाला आहे. ठाण्याच्या सीमेवरील हरीओमनगर तुकारामनगर परिसरासह इतर भागातील नागरिकांनाही या डंपिंग ग्राऊंडचा खूपच त्रास सहन करावा लागत होता.

गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील कचर्‍याच्या दुर्गंधीचा त्रास ठाण्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. मुलूंड डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपली असतानाही येथे कचरा टाकला जात होता. या कचर्‍याच्या दुर्गंधीचा त्रास हरीओमनगर तुकारामनगर परिसरासह कोपरी परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत होता. याठिकाणी कचर्‍याला अनेकवेळा आगी लागण्याचे प्रकारही घडले होते. त्यामुळे ठाणे पूर्वेतील हरिओमनगर, कोपरी गाव, पारशीवाडी, ठाणेकरवाडी, कन्हैय्यानगर ते थेट चेंदणी कोळीवाडा या भागातील नागरिकांना धूराचा त्रास सहन करावा लागत असे, हरिओमनगर आणि कोपरीगाव येथील नागरिक डंपिंग ग्राऊंडवरील कचर्‍यापासून निर्माण होणार्‍या दुर्गंधीनी त्रस्त असतानाच, धुराच्या त्रासामुळे नागरिकांचा श्वास कोंडला जायचा.

- Advertisement -

मुलूंड डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने अनेक आंदोलने केली होती. चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कचर्‍याने भरलेला ट्रक मुंबई महापालिकेसमोर टाकला होता. त्यावेळी आव्हाड यांना पोलिसांनी अटकही केली होती. तीन दिवस त्यांना आर्थररोड कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र आता या डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जाणार नसल्याने ठाणेकर नागरिकांनीही आनंद व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -