घरमुंबईमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पत्र प्रपंच

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पत्र प्रपंच

Subscribe

पंतप्रधानांना पाठविणार दहा हजार पोस्टकार्ड

तमिळ सह संस्कृत,तेलगु,कन्नड,मल्याळम,ओडीआ या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्ष उलटली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करीत आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीबाबत दबाव वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० हजार पोस्टकार्ड पाठविणार अशी घोषणा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.

पठारे समितीने आपल्या अहवालात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भातील सर्व कागदपत्रे, पुरावे, सादर केली आहेत. मात्र तरीही राज्य सरकार केंद्रावर दबाव आणत नाही आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळेच मनसे पोस्टकार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीने त्यांच्या भावना केंद्र सरकार कडे पोहचविणार असल्याची माहिती गजानन काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.तमिळ आणि इतर दक्षिणी भाषाकडून आपण भाषाप्रेम शिकायला हवे असे मत काल परवाच पठारे समितीचे समन्वयक हरी नरके यांनी व्यक्त केले होते. यापुढे राजकीय दबाव निर्माण करण्याचे काम, नागरिकांचे आहे असेही ते पुढे म्हणाले होते. त्यापासून धडा घेत सरकार वर दबाव निर्माण करण्यासाठी व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेने ही पोस्टकार्ड मोहीम सुरु केली असल्याची माहिती मनसेचे गजानन काळे यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -