घरमुंबई2032 मध्ये मंगळ ग्रहाच्या भूमीवर पाऊल

2032 मध्ये मंगळ ग्रहाच्या भूमीवर पाऊल

Subscribe

नासातील लहान शास्त्रज्ञ ठाण्यातील अक्षत मोहिते संशोधनात व्यग्र

मंगळ ग्रहाच्या भूमीवर अजूनही मानवाने पाऊल ठेवलेले नाही. मात्र त्यादृष्टीने नासात संशोधन सुरू आहे. आशिया खंडातील सर्वात लहान शास्त्रज्ञ म्हणून गौरविलेला ठाण्यातील अक्षत मोहिते याची सुध्दा या संशोधनात निवड झाली असून महत्वपूर्व सहभाग आहे. 2032 मध्ये मंगळ ग्रहावर लोकांना पाठविण्यात येणार आहे. त्या संशोधानात व्यग्र असल्याचे अक्षतने सांगितले. सध्या नासामध्ये काम करीत असलेल्या अक्षत मोहिते याने गुरुवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली.

ठाणेकर असलेला अक्षत मोहिते हा सर्वात लहान शास्त्रज्ञ नासामध्ये आहे. ही निश्चितच ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे उद्गार पालिका आयुक्त जयस्वाल यांनी यावेळी काढले व त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, संदीप डोंगरे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

नासाबद्दल देशातील मुलांना माहिती व्हावी व तरुणांना देखील या क्षेत्राबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी अक्षतने डिसेंबरमध्ये ठाण्यात एका सेमिनारचे आयोजन केले आहे. या सेमिनारमध्ये नासाचे शास्त्रज्ञ डॉ. रवि मार्गश्यम् व स्वतः अक्षत देखील मार्गदर्शन करणार आहे. ठाण्यातील आर्या केंब्रिज स्कूलमध्ये अक्षतचे शालेय शिक्षण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -