घरमुंबईदुर्मिळ हृदयदोषाच्या केनियाच्या रुग्णावर मुंबईत यशस्वी उपचार

दुर्मिळ हृदयदोषाच्या केनियाच्या रुग्णावर मुंबईत यशस्वी उपचार

Subscribe

२८ वर्षीय केनियातील महिलेवर दुर्मिळ हृदयदोषाच्या रुग्णावर मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात यश मिळालं आहे.

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टरांना केनियाच्या रुग्णावर दुर्मिळ हृदयदोषावर यशस्वी उपचार करण्यात यश आलं आहे. केनियातील २८ वर्षीय महिला (टाकायासू आर्टेरिटिस) या दुर्मिळ हृदयदोषाने त्रस्त होती. या आजारामुळे या महिलेला उच्च रक्तदाब आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवत होत्या. केनियाची रहिवासी हलिमा सलाद यांना चक्कर येणं, ओटीपोटात वेदना, डाव्या हातात अशक्तपणा, रक्तवाहिन्यांमध्ये ९५ टक्के अडथळे आदी समस्यांचा सामना करावा लागत होता. रक्तदाब नियंत्रित करणारी औषधे सुरू असूनही त्याचा फारसा परिणाम होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामात अडचणी येत होत्या. केनिया येथे अनेक औषधोपचार केल्यानंतरही महिलेला फारसा फरक जाणवला नाही पण, तपासणीअंती महिलेला दुर्मिळ ह्रदयदोष असल्याचे निदर्शनास आले. केनियामध्ये तज्ज्ञ डॉक्टर तसेच चांगल्या सुविधा नसल्यामुळे महिलेच्या कुटुंबियांनी मुंबईत उपचार घ्यायचा निर्णय घेतला.

फक्त २.६ प्रकरणांची वर्षभरात नोंद 

शरीराच्या हृदयापासून निघालेली धमनी जी शरीरातील इतर भागात रक्त वाहून नेण्याचे काम करते अशा या महा धमनीमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हा दुर्मिळ हृदयदोष झाल्याचे डॉ. रवि गुप्ता यांनी सांगितले. यामुळे, छातीत वेदना आणि उच्च रक्तदाबासारख्या समस्या उद्भवत होत्या. वर्षभरात अशा या दुर्मिळ हृदयदोषाची फक्त २.६ प्रकरणे नोंद केली जात असून महिलांमध्ये याचे प्रमाण दहापट अधिक असल्याचे आढळून येते.

- Advertisement -

नक्की वाचा – ठाणेकरांना आढळला बिबट्याचा बछडा

या समस्यांचा सामना करत असाल तर त्वरीत डॉक्टरांची भेट घ्या

या महिलेवर त्वरीत उपचार करण्याची आवश्यकता होती अथवा मेंदुत रक्तस्राव होण्याची शक्यता होती. याचे भान राखून त्वरीत उपचार करण्यात आले आणि पुढील धोक टळला. एंजिओप्लास्टीनंतर महिलेच्या डाव्या बाजूच्या धमनीतील रक्तप्रवाह सुरळीत करण्यात आला. त्यानंतर, रुग्णाच्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे देखील शक्य झाले. पण, त्यांना जेवणानंतर ओटीपोटात वेदना होत असल्याचे निदर्शनास आले आणि तपासणीनंतर असे दिसून आले की, आतड्यांना रक्तप्रवाहास अडथळा निर्माण होत आहे आणि त्यावरही एंजिओप्लास्टीनंतर सुधारणा झाल्याचे आढळले. मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टिमने दुर्मिळ हृदयदोषावर यशस्वी उपचार केले. त्यामुळे, जर तुम्ही उच्च रक्तदाब, चक्कर येणे अशा समस्यांचा सामना करत असाल तर त्वरीत डॉक्टरांची भेट घ्या.

- Advertisement -

हेही वाचा – विद्यापीठाचा बी. कॉम. सत्र ५ चा निकाल जाहीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -