घरमुंबईरसवंती चालकाचा मुलगा बनला अधिकारी

रसवंती चालकाचा मुलगा बनला अधिकारी

Subscribe

येथील रसवंतीगृह चालवणाऱ्याचा मुलगा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला जलसंधारण अधिकारीपदावर नियुक्ती मिळाली आहे. रमेश सोनवणे व त्यांची पत्नी स्मिता सोनवणे हे दोघेही रसवंतीचा
व्यवसाय करत असून त्यांचा मुलगा शुभम हा शिक्षण करून त्यांना रसाच्या दुकानावर मदत करत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन जलसंधारण अधिकारी झाला आहे.

सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील मूळ रहिवासी आहेत. याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा येवला यांच्यावतीनेहीशुभम सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजयोगिनी नीतादीदी, अनुदिदी व
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. राजयोग मेडिटेशनमुळे अभ्यासासाठी आपल्या मनाची एकाग्रतावाढवून आपण आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकतो याची प्रचिती येथे आली. सुनील
गाडेकर या शिक्षकांनी व त्यांच्या सौभाग्यवती यांनीही ब्रम्हाकुमारी सेवाकेंद्रामध्ये येऊन शुभम यांचा सत्कार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -