घरताज्या घडामोडीsushant singh -रिया चक्रवर्तीला अटक होणार का? सीबीआय इन Action

sushant singh -रिया चक्रवर्तीला अटक होणार का? सीबीआय इन Action

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. याप्रकरणी सीबीआयने आधीच एफआयआर दाखल केली आहे. यामुळे सीबीआयची विशेष टीम लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांना आतापर्यंत केलेल्या तपासाचा तपशिल या टीमला द्यावा लागेल. तसेच याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ज्यांचे जबाब नोंदवले त्यांचीही उलटतपासणी केली जाईल. यावेळी रिया व तिच्या कुटुंबीयांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. यामुळे यापुढे हे प्रकरण सीबीआय हाताळणार असून सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गोळा केलेले सर्व पुरावे, साक्ष, पोस्टमार्टेम रिपोर्ट सीबीआय ताब्यात घेणार आहे. त्यानंतर सुशांतने बांद्रा येथील ज्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली तेथेही ही टीम जाणार आहे. सुशांतच्या आत्महत्याचा घटनाक्रम येथे पुन्हा रिक्रिएट केला जाईल. ज्यावेळी सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी त्याच्या फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांचा जबाब ही विशेष टीम घेणार आहे. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक , वडील इंद्रजीत व इतरांना चौकशीसाठी समन पाठवले जाईल. चौकशीत जर काही संशयित वाटले तर रिया व इतरांना अटक होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, सीबीआयची विशेष टीम मुंबईतील युनिटच्या संपर्कात असून मुंबईत आल्यानंतर नव्याने पंचनामा दाखल करणार आहे. त्यानंतर या प्रकरणाचे पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू होईल. सीबीआयच्या मुंबई कार्यालयात २५ जणांना कोरोना झाल्यामुळे सध्या हे कार्यालय बंद करण्यात आले आहे. यामुळे सीबीआयला नवीन कार्यालय शोधावे लागणार आहे. दुसरीकडे रियाने सुरुवातीला याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली होती. सोशल मीडियावर तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यासंदर्भात एक पोस्टही टॅग केली होती. मात्र याप्रकरणात बिहार पोलिसांची एन्ट्री झाल्यानंतर तिने हे प्रकरण सीबीआय व बिहार पोलिसांकडे वर्ग करण्यावर विरोध दर्शवला होता. यामुळे आता रिया सीबीआयला किती सहकार्य करते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -