घरमुंबईBharat Bandh: 'जबरदस्ती करून आजचा बंद करायचा नाही तर...'

Bharat Bandh: ‘जबरदस्ती करून आजचा बंद करायचा नाही तर…’

Subscribe

'खऱ्या अर्थाने एकाकीपणे लढणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे चित्र सर्वसामान्य जनतेने दाखवून दिले'

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज असलेल्या भारत बंदमध्ये नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात देखील भारत बंद कडकडीत पाळला गेला आहे. नागरिकांनी भारत बंद आणि शेतकऱ्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल राजू शेट्टी यांनी नागरिकांचे आभार देखील मानले आहेत. राजू शेट्टींनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांना एक विनंती देखील केली. ते असे म्हणाले की, जोर जबरदस्ती करून आम्हाला हा आजचा भारत बंद करायचा नाही तर जनतेचं मत परिवर्तन करून जनतेचा पाठिंबा मिळवायचा आहे. या बंदमध्ये जनतेचा सहभाग आणि पाठिंबा मिळवून राज्यकर्त्यांना दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की, आजच्या भारत बंदमध्ये सगळे सहभागी होऊन हा बंद पाळतील.

https://fb.watch/2e_UvBNKAW/

- Advertisement -

दरम्यान, आजच्या भारत बंदमध्ये केवळ शेतकरी नव्हे तर कष्टकरी, व्यवसायिकांसह व्यापाऱ्यांनी देखील या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. तर या बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपले व्यवहार बंद ठेवले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने एकाकीपणे लढणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे चित्र सर्वसामान्य जनतेने दाखवून दिले आहे.

यासह नागरिकांनी भारत बंद आणि शेतकऱ्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल राजू शेट्टी यांनी नागरिकांचे आभार देखील मानले आहेत. तर आजच्या भारत बंदमध्ये नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यावरून असे लक्षात येते की, शेतकरी एकाकी नाही हे आल्हाददायक चित्र आज बघायला मिळालं.


तर फडणवीसही शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहतील – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -