घरमुंबईतर फडणवीसही शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहतील - संजय राऊत

तर फडणवीसही शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहतील – संजय राऊत

Subscribe

मी संपुर्ण देशात माहिती घेत आहे. भाजपची सत्ता नाही तिथेही भारतबंदला स्वेच्छेने, मनापासून, स्वयंस्फुर्तीने प्रतिसाद मिळत आहे. आज शेतकरी रस्त्यावर आहे, तो गोळ्या झेलण्यासाठी का तयार झाला ? याचा राजकीय विचार विरोधकांकडून झाला, तर विरोधी पक्षातले देवेंद्र फडणवीस देखील शेतकऱ्यांच्या बाजून उभे राहतील असा विश्वास शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

कष्टकरी, शेतकरी जो गेल्या १२ दिवसांपासून सरकारी दडपशाही विरोधात दिल्लीच्या सीमेवर संघर्ष करतोय त्याला सहकार्य करण्याचे देशातल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारत बंदला केवळ भारतातच नव्हे तर संपुर्ण जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील कोणत्याही राकीय पक्षाने आजच्या भारत बंदच्या निमित्ताने रस्त्यावर येण्यासाठी कोणीही आवाहन केलेले नाही. त्यामुळेच राजकीय पाठबळ नाही हे विरोधी पक्षनेत्याने समजून घ्यायला हवे. या आंदोलनात कोणताही झेंडा नाही. राजकीय बंद नाही, ही जनतेची भावना आहे असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

आज देशव्यापी असा सुरू असलेला भारत बंद राजकीय नाही, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून उत्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय हा संप असल्याचे विरोधी पक्षाने समजून घ्यायला आहे. केंद्र सरकार मनापासून जेव्हा काम करेल तेव्हा शेतकऱ्यांचा दबाव केंद्रावर नसेल. शेतकऱ्यांचे म्हणणे केंद्राने एकायल हव. कोणत्याही जबरदस्तीने हा संप करण्यात आलेला नाही. मर्यादित स्वरूपाचा संप असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -