घरमुंबईया सात वर्षाच्या जादुगाराने केले सात वर्ल्ड रेकॉर्ड्स

या सात वर्षाच्या जादुगाराने केले सात वर्ल्ड रेकॉर्ड्स

Subscribe

हा सात वर्षाचा चिमुरडा जादूचे प्रयोग करतो. त्याने आतापर्यंत जवळजवळ दिडशे जादूचे प्रयोग केले आहेत. या चिमुरड्याने सात वर्ल्ड रेकॉर्डही केले आहेत.

जादू पहायला कोणाला आवडत नाही. जादूचे प्रयोग तर अनेकांचे मनोरंजनाचे साधन असते. परंतु आपण जे जादुगार पाहतो, ते तरुण किंवा थोडे अनुभवी असतात. परंतु हा एक सात वर्षाचा जादुगार आणि त्याचे जादुचे प्रयोग लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. स्वरांग प्रितम रणदिवे असे या छोट्या जादुगाराचे नाव आहे. विरार येथे राहणारा हा चिमुकला वयाच्या चौथ्या वर्षापासून जादुचे प्रयोग करत आहे. त्याचे वडील जादुगार प्रितम विजय रणदिवे हे त्याचे गुरू आहेत. ते नॅशनल को-ऑफ बँकेतल्या नरीमन पॉइन्ट शाखेत कॅशियर म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत जादुगार स्वरांग रणदिवे याने १५० पेक्षा जास्त जादुचे कार्यक्रम पूर्ण केले आहेत, तसेच ४५ पुरस्कार आणि ७ वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित केले आहेत.

स्वरांगच्या विक्रमांची नोंद

१)भारत बुक ऑफ रेकॉर्ड
२)आंध्र बुक ऑफ रेकॉर्ड
३)जिनिअस बुक ऑफ रेकॉर्ड
४)वंडर बुक ऑफ रेकॉर्ड
५)भारत वर्ल्ड रेकॉर्ड
६)गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड
7)वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि भारत बाल विषुशन-आंतरराष्ट्रीय अवॉर्ड.

- Advertisement -

वाचा – चिमुरडीने गिळली सेफ्टी पिन, थोडक्यात वाचले प्राण

प्रेम चोप्रांनी केले कौतुक

प्रेम चोपडा यांना फिल्म इंडस्ट्री मध्ये ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमात स्वरांगने त्याचा जादूचा कार्यक्रम सादर केला. प्रेम चोप्रा यांनी स्वरांगला रंगमंचावर बोलावून त्याचे कौतुक केले. तेव्हा ते म्हणाले की, मी या वयात काय करत होतो हे मलाही आठवत, या वयात हा मुलगा इथे माझ्या कार्यक्रमात त्याची जादुची कला दाखवून लोकांना मंत्रमुग्ध करून टाकतोय. स्वरांग लवकरच एका हॉलिवूड चित्रपटात आणि एका मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -