घरमुंबईचिमुरडीने गिळली सेफ्टी पिन, थोडक्यात वाचले प्राण

चिमुरडीने गिळली सेफ्टी पिन, थोडक्यात वाचले प्राण

Subscribe

मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे तिचे प्राण वाचले.

मंगळसूत्राला अडकवलेली सेफ्टी पिन ३ वर्षाच्या चिमुरडीने गिळल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या मुलीला तात्काळ परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अहमदनगरच्या ३ वर्षीय अमृता भिसे (नाव बदललेलं आहे) या मुलीने उघडलेली सेफ्टी पिन गुरुवारी गिळली. ती सेफ्टी पिन आईच्या मंगळसूत्राला अडकवलेली होती. मुलगी खेळत असताना ही सेफ्टी पिन मुलीने तोंडात घातली. काहीवेळाने तिला खाताना, गिळताना त्रास होऊ लागला. ही बाब लक्षात येताच तिला स्थानिक रुग्णालयात तपासणीसाठी नेले पण तिथल्या डॉक्टरांनी अमृताच्या घरच्यांवना मुंबईत जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अमृता शुक्रवारी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल झाली. तिच्या प्राथमिक तपासण्या केल्यानंतर तिच्या अन्न नलिकेत सेफ्टी पिन अडकल्याचं समोर आलं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ही पिन अन्ननलिकेत रूतून बसल्यामुळे ती काढणं अत्यंत अवघड होतं. मात्र, लवकरात लवकर पिन बाहेर काढून तिचा जीव वाचवणंही महत्त्वाचं होतं. त्यानुसार, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि शनिवारी सकाळी टेलिस्कोपद्वारे पिन बाहेर काढण्यात आली. वेळीच उपचार झाल्यामुळे या चिमुरडीचे प्राण वाचले.

 

- Advertisement -
मुलीच्या गळ्यात सेफ्टीपिन अडकल्याचं या एक्सरेमध्ये स्पष्ट दिसून येत आहे

याविषयी माहिती देताना केईएम रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. निलम साठे यांनी सांगितलं, ‘ही सेफ्टी पिन उघडी असल्याकारणाने ती अन्न नलिकेच्या बाजूच्या भागाला ही अडथळा निर्माण करु शकली असती. त्यासोबतच ती छातीच्या भागातही पुढे सरकू शकली असती. त्यामुळे आम्हाला टेलीस्कोपद्वारे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. टेलिस्कोपद्वारे पहिल्यांदा पिन खाली ढकलली आणि त्यानंतर त्याचा टोकदार भाग चिमट्याच्या सहाय्याने पकडून ती पिन बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया खूप आव्हानात्मक असल्याने या शस्त्रक्रियेसाठी पाऊण तासांचा कालावधी लागला.’

अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी लहान मुलं खेळत असताना पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावं तसंच पिन्स, नाणी अशा गोष्टी लहान मुलांपासून दूर ठेवाव्यात, असं आवाहनही डॉ. साठे यांनी केलं आहे.


Video: खऱ्याखुऱ्या मांजरीचा रॅम्पवर ‘कॅट’वॉक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -