घरताज्या घडामोडीमुंबईकरांना तूर्त दिलासा; अकृषिक कराच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती

मुंबईकरांना तूर्त दिलासा; अकृषिक कराच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती

Subscribe

मुंबई उपनगरातील रहिवाशांकडून वसूल केल्या जाणाऱ्या अकृषिक कराच्या नोटींसींना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. महसूल विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. या निर्णयामुळे मुंबई उपनगरातील रहिवाशांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

मुंबई उपगरात राहणाऱ्या सुमारे ६० हजाराहून अधिक गृहनिर्माण संस्थांना अकृषिक कराच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. ज्यावेळी उपगरामध्ये इमारती, चाळी आणि अन्य रहिवाशी बांधकामे करण्यात आली त्यावेळी प्रत्येक बांधकामाने अकृषिक कर भरला होता. त्यानंतर ही प्रत्येक वेळा त्यांना या कराच्या नोटीसा बजावल्या जात होत्या. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता. त्यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकृषिक कराच्या वसुलीला स्थगिती देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज शासन परिपत्रक जारी करण्यात आले.

- Advertisement -

५ फेब्रुवारी २०१८ च्या परिपत्रकात नमूद केलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर करण्यात येणाऱ्या अकृषिक कराच्या आकारणीच्या वसुलीला पुढील आदेश होईपर्यंत याद्वारे तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


हेही वाचा – Mumbai Traffic : ट्रॅफिकमध्ये अडकलात ? मुंबई ट्रॅफिक पोलिसांचे नवीन ट्विटर हॅण्डल करा फॉलो

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -