घरताज्या घडामोडी'हिमालय' पुलाची पाया उभारणी, डिसेंबर अखेर पादचाऱ्यांसाठी खुला होणार

‘हिमालय’ पुलाची पाया उभारणी, डिसेंबर अखेर पादचाऱ्यांसाठी खुला होणार

Subscribe

१४ मार्च रोजी २०१९ सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसराला जोडणाऱ्या ‘हिमालय’ पुलाची दुर्घटना घडून ७ जण मृत तर ३० जण जखमी झाले होते. तो पूल नव्याने उभारण्याचे काम विविध कारणास्तव अडीच वर्षे रखडले होते. आता जानेवारी २०२२ पासून ते काम खऱ्या अर्थाने सुरू झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर सदर नवीन पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती पालिका पूल खात्याचे प्रमुख अभियंते सतीश ठोसर यांनी दिली आहे.

हिमालय पूल हा टाइम्स ऑफ इंडिया प्रमुख कार्यालय परिसर आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडणारा महत्वाचा पूल होता. या पुलावरून दररोज हजारो पादचारी ये – जा करीत असत. मात्र १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळच्या सुमारास ह्या पुलाचा मोठा भाग अचानक कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले होते. त्यानंतर या पुलाची तात्काळ उभारणी होऊन तो पादचाऱ्यांच्या सेवेत उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक अडचणी, पुलाच्या डिझाईनमधील बदल, पावसाळा आदी कारणांस्तव ह्या पुलाच्या उभारणीच्या कामाला अडीच वर्षे विलंब झाला.

- Advertisement -

या पुलाचे काम ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू करण्यात आले होते. पण खऱ्या अर्थाने जानेवारी २०२२ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र अद्यापही पुलाच्या पाया उभारणीचे काम सुरू असून गेल्या काही दिवसांत सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावळील भागात पुलाचा प्रमुख आधार असलेला एक सिमेंटचा पिलर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून एका आठवड्या भरात पिलर पूर्णपणे उभारला जाईल.

तसेच, अंजुमन इस्लाम व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसरातील दुसऱ्या भागातही पुलाचा प्रमुख आधार असलेला पिलर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलाच्या बांधकामात सिमेंट, स्टील, लोखंड यांचा वापर करण्यात येणार आहे. ह्या पुलाची लांबी ३० मिटर व रुंदी ९ मिटर इयकी असणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे ११ कोटी रुपयांपर्यन्त खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच, पुलाची उभारणी करताना डीएन रोडवरील वाहतुकीला जास्त अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पालिका समित्या संपुष्टात, चिटणीस विभागाकडून प्रशासकाकडे प्रस्ताव मंजुरीस पाठवणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -