घरमुंबईThackeray Group Press : कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही; विधिज्ञ असीम सरोदेंचा...

Thackeray Group Press : कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही; विधिज्ञ असीम सरोदेंचा खुलासा

Subscribe

सुरुवातीलाच वकील असिम सरोदे यांनी या महापत्रकार परिषदेतून मोठा गौप्यस्फोट केला असून, आता पुढे कोण काय काय खुलासा करतो हे पाहवा लागणार आहे. 

मुंबई : शिवसेना आमदार आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला दिला. या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाने न्यायालयाची दारे ठोठावली आहेत. असे असतानाच शिवसेनेच्या (ठाकरे गट) महापत्रकार परिषदेला सुरुवात झाली असून, यामध्ये विधिज्ञ असीम सरोदे यांनी मोठा खुलासा केला आहे. कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. (Thackeray Group Press  Legislative party does not matter in law Disclosure of lawyer Asim Saroden)

सुरुवातीलाच वकील असीम सरोदे यांनी या महापत्रकार परिषदेतून मोठा गौप्यस्फोट केला असून, आता पुढे कोण काय काय खुलासा करतो हे पाहवा लागणार आहे.

- Advertisement -

लढा कसा लढला कुठल्या पातळीवर लढल्या गेला याची माहिती देताना वकील असीम सरोदे म्हणाले की, कायदा जर लोकांसाठी असेल तर लोकांमध्ये बोलले पाहीजे. आज जनतेचं न्यायालय आयोजित करण्यामागेही मोठं कारण आहे. कारण, ज्यांचा सल्ला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश घेत होते ते नानी पालखीवाला यांचा आज जन्म दिवस आहे. या जनतेच्या न्यायालयाला दुसरी कोणतीच बाजू नाही. केवळ सत्याची बाजू आहे. बाजू मांडत असताना सुरुवातीलाच सांगतो की, अपात्रेतेच्या निकालावर भारतातील प्रत्येक नागरिकांना न्यायालयाने दिलेला निकालाचे विश्लेषण करण्याचा संपूर्ण हक्क आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन केले अशीही माहिती यावेळी विधिज्ञ असीम सरोदे यांनी दिली.

हेही वाचा : Bipin Rawat : काश्मीरमधील स्टेडियमला ​​माजी सीडीएस बिपिन रावत यांचे नाव 

- Advertisement -

तर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालातून एवढंच दिसतं की, पक्षांतर कसं करायचं हे राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालातून पुढे आलं. कायदेविरुद्ध प्रवृत्ती एक तयार होत आहे. त्याविरुद्ध बोललं पाहीजे. 10 जानेवारी 2024 चा निर्णयाचं विश्लेषण करणं हे जास्त आवश्यक आहे. यातून लोकशाही कशी मारली जाते हे यातून स्पष्ट होते असेही यावेळी विधिज्ञ असिम सरोदे यावेळी म्हणाले. मला म्हटलं जात तुम्ही वकील आहात राजकारणावर बोलू नका परंतु भारतीय राज्यघटना ही पॉलिटीकल डॉक्यूमेंट आहे. आपण आहोत नागरिक आणि मतदार आहोत. त्यामुळे प्रत्येकांने राजकारणावर बोललं पाहीजे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. तर जेव्हा मी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना भेटलो तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही टीव्हीवर बोलताना आमची बाजू चांगली मांडता, तेव्हा मी त्यांना म्हणालो की, मी तुमची बाजू मांडत नाही तुम्हीच संविधानाच्या बाजूने आहात अशीही माहिती सरोदे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेतून कोणता गौप्यस्फोट होणार? उत्सुकता शिगेला

पक्षांतर बंदी कायदा आहे हे परिशिष्ट 10 मध्ये येते. मुळातच देवेंद्र फडणवीस यांनी फूस लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पळवून नेले. त्यांच्यामुळेच कायदेविषयक प्रबोधन करणं सोपं होत असल्याचाही टोला यावेळी सरोदे यांनी लगावला. पुढे बोलताना असिम सरोदे म्हणाले की, पक्षांतर बंदी कायदा म्हणजे पक्षांतर करणे हा त्याचा उद्देश नाही. राजकीय अस्तिरतेचं राजकारण बाजुला राहिलं पाहीजे म्हणून 1985 साली कायदा आणला. कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही. मुळ राजकीय पक्षाला महत्त्व आहे. विधिमंडळ पक्षावरही मुळ राजकीय पक्ष नियंत्रण ठेऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत पळून गेलेले आमदार हे अस्तायी स्वरुपाच्या पक्षाचे आमदार आहेत असाही खुलासा त्यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -