घरमुंबई'ठाणे जिल्हा मजूर फेडरेशन'च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड संपन्न

‘ठाणे जिल्हा मजूर फेडरेशन’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड संपन्न

Subscribe

अध्यक्षपदी पंडीत पाटील तर उपाध्यक्षपदी नलिनी चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी पंडीत नकुल पाटील तर नलिनी चौधरी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ठाणे भाजप विभागीय अध्यक्ष तथा खासदार कपिल मोरेश्वर पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) प्रकाश नकुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीमुळे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभा निवडणूकीत ठरल्याप्रमाणे महायुतीचा धर्म पाळला आहे. खासदार कपिल पाटील यांना दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. विशेष म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी पक्षाचा आदेश पाळून प्रचंड मताधिकाक्याने कपिल पाटील यांना निवडून येण्यास हातभार लावला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती अभेद्य राहिली आहे.

हेही वाचा – राज्य पोलीस दलातील 46 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

मजूर फेडरेशन निवडणूक ही युतीचा हा एक भाग असून यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये खासदार कपिल पाटील व जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध घोषित होताच अध्यक्ष पंडित पाटील व उपाध्यक्षा नलिनी चौधरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. तसेच जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, खासदार कपिल पाटील यांचे देखील मनःपूर्वक आभार मानले. सदर निवडणुकीत शिवसेना ८, भाजप ७, काँग्रेस २, राष्ट्रवादी १, बहुजनविकास आघाडी १, अपक्ष १ असे पक्षीय संस्थाबळ असून युतीचे १५ संचालक झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यास कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -