घरमुंबईआरोपीने न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या चपला

आरोपीने न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या चपला

Subscribe

न्यायाधीशांनी आरोपीला शिक्षा सुनावताच त्या आरोपीने पायातील दोन्ही चप्पला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी न्यायालयात समोर आला आहे. अश्रफ अन्सारी (22) असे आरोपीचे नाव आहे.भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी अश्रफ याला मंगळवारी दुपारच्या सुमाराला भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश जे. एस. पठाण यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायाधीशांनी आरोपी अश्रफला शिक्षा सुनावताच आरोपीने राग धरून पायातील दोन्ही चप्पला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या होत्या. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला.

आरोपी अश्रफ अन्सारी हा भिवंडी शहरातील आमपाडा परिसरात राहणारा असून त्याच्यावर काही गुन्हे भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याच गुन्ह्याच्या संदर्भात मंगळवारी भिवंडी न्यायालयात न्यायाधीश पठाण यांच्या न्यायालयात शिक्षेच्या सुनावणी साठी हजर केले. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बी. एस. पाटील यांच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी अश्रफ अन्सारी याच्या विरोधात गुन्हा करून त्याला ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांनी पंचनामा करीत भिरकावलेल्या दोन्ही चपला घटनास्थळावरून हस्तगत केल्या आहेत. तर या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बुधवारी वकीलांनी कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. असे भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष मंजित राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -