घरमुंबईमुंबरेश्वर मंदिराच्या महाप्रसादात विष कालवण्याचा कट उघड

मुंबरेश्वर मंदिराच्या महाप्रसादात विष कालवण्याचा कट उघड

Subscribe

मुंब्यातून १० जण अटकेत

एटीएस पथकाने मुंब्यातून अटक केलेल्या दहाही तरुणांनी मुंबरेश्वर मंदिराच्या महाप्रसादात विष कालवण्याचे घातक षडयंत्र रचल्याचे उघडकीस आले आहे. मुंब्रा येथील मुंब्रेश्वराच्या मंदिरातील महाप्रसादात हे दहाही जण विष कालवणार होते, महाप्रसादात विष टाकून लोकांना मारण्याचा त्यांचा डाव होता. तसेच हे सर्व तरुण झाकीर नाईकपासून प्रभावित होते, असे एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुंब्रा येथे चारशे वर्ष जुने मुंब्रेश्वर मंदिर आहे. या मंदिरात श्रीमद भागवद् कथेचे डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात आले होते. ही संधी साधून अटक करण्यात आलेल्या तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिकने मंदिरातील महाप्रसादात विष टाकण्याचा प्लान तयार केला होता. मात्र त्या दिवशी मंदिरात 40 हजारांहून अधिक भाविक आल्याने त्यांची योजना फोल ठरल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

अबू हमजा हा या ग्रुपचा मोहोरक्या असून त्याने मुंब्रा बायपास येथे स्फोटाचे प्रात्यक्षिकही केलं होते. हमजा आणि पोतरिकला या कामात मोहसीन खान उर्फ अबू मोर्या, अताई वारीस अब्दूल रशीद शेख उर्फ मझहर शेख, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, मुशाहेदूल इस्लाम उर्फ तारेख, जम्मन खुठेऊपाड उर्फ अबू किताई, सलमान खान उर्फ अबू उबेदा आणि फरहाद अन्सारी यांनी साथ दिल्याचे एटीएसने म्हटले आहे. यातील दहावा आरोपी अल्पवयीन आहे. हे सर्वजण मुंब्रा आणि औरंगाबादचे रहिवासी आहेत.

बॉम्ब बनवण्याच्या साहित्याची माहिती
आरोपपत्रानुसार हे दहाही जण झाकीर नाईकपासून प्रेरित होते. या दहाही जणांच्या सोशल मीडियावरून झाकीर नाईकचे फोटो आणि व्हिडिओज जप्त करण्यात आले आहेत. हे दहाही जण मुंब्रा परिसरातील आणखी सहाजणांची माथी भडकावण्याचे काम करत होते. मात्र या सहा तरुणांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे. अटक करण्यात आलेले दहा जण उच्चशिक्षित आणि टेक्नोसॅव्ही आहेत. एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी ते टेलिग्राम या अ‍ॅपचा वापरही वापर करत होते. टेलिग्रामद्वारे या दहाही जणांनी एकमेकांना बॉम्ब बनविण्याच्या साहित्याची माहिती पुरवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -