घरलाईफस्टाईलखेळाडूंना होणाऱ्या घोट्याच्या दुखापती

खेळाडूंना होणाऱ्या घोट्याच्या दुखापती

Subscribe

खेळाडूंना होणाऱ्या घोट्याच्या दुखापतींवर योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे असते.

क्रीडाप्रकार म्हणजे शारीरिक क्रिया आहेत आणि जेव्हा आपण शारीरिक क्रिया करतो, तेव्हा दुखापतीची शक्यता असते हे साहजिक आहे. अतिवापरामुळे होणाऱ्या तसेच अवयव मुरगळल्याने किंवा ताणला गेल्याने होणाऱ्या गंभीर दुखापती क्रीडापटूंच्या आयुष्यात नेहमीच्याच असतात. एखाद्या अवयवावर अतिरिक्त ताण पडल्याने किंवा तो झिजल्याने होणाऱ्या दुखापती या अतिवापरामुळे होणाऱ्या दुखापती समजल्या जातात. विशेषत: काही अवयवांना त्या क्रियांची पुनरावृत्ती झाल्यामुळे या दुखापती होतात. घोटे, गुडघे, कंबर, खांदे, कोपर आणि मनगट या शरीरातील प्रमुख साध्यांना अतिवापरामुळे दुखापती होतात. तणावामुळे होणारी दुखापत म्हणजे स्नायूंमधील तंतू ताणले गेल्यामुळे किंवा स्नायूबंध फाटल्यामुळे होणारी दुखापत. या दुखापती बहुतेकदा अवयवाला अतिताण दिल्यामुळे होतात. मुरगळण्यामुळे होणाऱ्या दुखापतींमध्ये अस्थिबंध (लिगामेंट्स) अति ताणले जातात किंवा फाटतात. त्यामुळे अनुकूल कंडिशनिंग, पुरेसे वॉर्म अप व्यायाम, योग्य पादत्राणे (फूटवेअर) वापरणे तसेच अचूक तंत्रांचा वापर यांच्या मदतीने यातील प्रमुख दुखापती दूर ठेवणे शक्य आहे.

घोट्याची दुखापत

कोणत्या प्रकारच्या हाडाचे, अस्थिबंधाचे (लिगामेंट) किंवा स्नायूबंधाचे नुकसान झाले आहे, यावरून या दुखापतीचे निदान केले जाते. घोट्यामध्ये तुमच्या शरीरातील तीन हाडे एकत्र येतात. तुमच्या पोटरीची तिबिया आणि फिब्युला ही हाडे पावलाच्या टॅल्युस हाडाशी जोडली जातात. घोटाच्या सांध्यामध्ये ही तीन हाडे अस्थिबंधाने एकमेकांना जोडली जातात. परस्परांना जोडणाऱ्या उतींच्या एका पक्क्या इलॅस्टिक बंधाद्वारे ही हाडे योग्य जागी ठेवली जातात आणि त्याचवेळी घोट्याची हालचालही सामान्य पद्धतीने होईल याची काळजी घेतली जाते. स्नायूबंध स्नायूंना हाडांशी जोडून ठेवतात आणि त्याद्वारे घोटा व पावलाची हालचाल होत राहते व सांधे स्थिर राहतात. म्हणूनच, घोट्याच्या सांध्याला पीळ पडला तर तो सामान्य अवस्थेत राहू शकत नाही आणि घोट्याची दुखापत होते. याशिवाय, उंच टाचेचे बूट किंवा डगमगणाऱ्या सॅण्डल्स घातल्याने घोटा अनैसर्गिक स्थितीत राहतो आणि त्यामुळे घोट्याला दुखापतीची शक्यता वाढते. त्याचबरोबर अडखळणे किंवा पडणे, उडी मारल्यानंतर पाय जमिनीवर टेकवताना विचित्र स्थिती होणे, उंचसखल पृष्ठभागावर चालणे किंवा पळणे, घोट्याला पीळ देणे किंवा फिरवणे यांमुळेही घोट्याची दुखापत होऊ शकते. सूज येणे, हुळहुळे होणे, खरचटणे, वेदना आणि ताठरपणा ही घोट्याच्या दुखापतीची लक्षणे काही जणांमध्ये दिसू शकतात. तसेच तुम्हाला घोट्याची दुखापत झाली असेल, तर तुम्ही राइस अर्थात RICE (रेस्ट, आइस, कंप्रेशन आणि एलिव्हेशन) उपचार घेतले पाहिजेत.

  • विश्रांती (रेस्ट): तुमच्या घोट्याला विश्रांती देऊन पुढील हानी टाळणे महत्त्वाचे आहे. घोट्यावर अधिक वजनाचा भार टाकू नका.
  • बर्फ (आइस): बर्फ लावल्याने सूज कमी होते आणि वेदनाही कमी होतात.
  • कंप्रेशन: घोटा इलॅस्टिक बॅण्डेजमध्ये बांधून ठेवल्यास त्याला आधार मिळत राहतो आणि त्याची हालचालही सुरू राहते. मात्र, घोटा खूप घट्ट बांधू नका.
  • उंचावून ठेवणे (एलिव्हेट): दुखापत झालेला घोटा किमान तुमच्या हृदयाच्या स्तरापर्यंत उंचावून ठेवल्यास तुम्हा सूज आणि वेदनेतून सुटका मिळवण्यात मदत होईल. दुखापत झालेला घोटा किमान तुमच्या हृदयाच्या स्तरापर्यंत उंचावून ठेवल्यास तुम्हा सूज आणि वेदनेतून सुटका मिळवण्यात मदत होईल.डॉ. अनुप खत्री, कन्सल्टंट, अस्थिविकार विभाग, ग्लोबल हॉस्पिटल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -