घरमुंबईकंत्राटी कामगारांसाठीच्या जाचक अटी रद्द करा

कंत्राटी कामगारांसाठीच्या जाचक अटी रद्द करा

Subscribe

रेल्वेविरोधात आंदोलन ,  रेल्वे वर्कशॉपमधून १७० कंत्राटी कामगारांचे तडकाफडकी निलंबन

माटुंगा वर्कशॉपमधील १७० कंत्राटी कामगारांना नव्या अटी आणि शर्ती लावून तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आल्याचे वृत्त सर्वप्रथम दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकशित केले होते. हे वृत्त प्रकशित होताच सेंट्रल रेल्वे मजदूर संघटनेने मंगळवारी माटुंंगा वर्कशॉपसमोर आंदोलन करत या नव्या अटी आणि शर्ती रद्द करण्याची मागणी केली. जर अटी आणि शर्ती तात्काळ रद्द केल्या नाही, तर आम्ही रेल्वे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याविरोधात कोर्टात धाव घेणार आहोत, असा इशारा सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाने दिला.

मध्य रेल्वेच्या मोठ्या वर्कशॉपपैकी माटुंगा वर्कशॉप हे आहे. या वर्कशॉपचे अधिकाधिक काम खासगी कंत्राटदारांना दिले आहे. ज्यामध्ये स्वच्छतेपासून रेल्वे डब्यांच्या दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. हे काम करत असताना कामगार कायद्याला बगल देत खासगी कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक कंत्राटदारांकडून वर्कशॉपमध्ये होत आहे. माटुंगा वर्कशॉपमध्ये सफाई कर्मचार्‍यांचे कंत्राट नुकतेच संपले आहे. त्यामुळे नवीन कंत्राट मिळाल्यानंतर जुन्या कर्मचार्‍यांना कामावर घेण्यात येईल, असे आश्वासन कंत्राटदाराने कामगारांना दिले. नवीन अटी आणि शर्ती लादून वर्कशॉपमधून १७० कामगारांना कामावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आले. परिणामी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली. वर्कशॉप प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघटनेकडून करण्यात आला.

- Advertisement -

सफाई कामगारांसाठी १० वी पासच्या अटीवर आक्षेप
याआधी रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये कंत्राटी कामगारांना नियुक्त करताना फक्त आठवी पास अशी शैक्षणिक अट होती. मात्र, आता या नियमात बदल करण्यात आले असून सफाई कर्मचार्‍यांसाठी १०वी पास आणि ४५ वयाची मर्यादा टाकली आहे. त्यामुळे आता कारखान्यात सफाई काम करणारे अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचार्‍यांची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा बसत नसल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे. त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. माटुंगा वर्कशॉपमध्ये खासगी कर्मचार्‍यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन रेल्वेे वर्कशॉपमधील अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात आवाज उचलला पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर आम्ही मध्य रेल्वे विरोधात कोर्टात जाणार, असा इशारा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटनागर यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -