घरमुंबईवीज दिव्यांची सेवा देण्यास महापालिकेला चोरीचीच भीती

वीज दिव्यांची सेवा देण्यास महापालिकेला चोरीचीच भीती

Subscribe

मुंबईतील जनतेला नागरी पायाभूत सेवा सुविधा पुरवणार्‍या महापालिकेला अनेक नागरी वस्तींमध्ये वीजेचे दिवे बसवणे आवश्यक असले तरी वीज आणि दिवे चोरीची भीती वाटू लागली आहे.

मुंबईतील जनतेला नागरी पायाभूत सेवा सुविधा पुरवणार्‍या महापालिकेला अनेक नागरी वस्तींमध्ये वीजेचे दिवे बसवणे आवश्यक असले तरी वीज आणि दिवे चोरीची भीती वाटू लागली आहे. मुंबईतील दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टींमध्ये वीजेचे दिवे लावण्याची मागणी होत असली तरी दिवाबत्तीच्या सुविधेतून वीज चोरी होण्याची तसेच या दिव्यांची चोरीस जाण्याची शक्यता असल्यानेच महापालिकेने झोपडपट्टींमध्ये विजेचे दिवे लावण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे डोंगर भागांमध्ये वीज दिव्यांचा प्रकाश लखलखणार नाही.

मुंबईत दहा फुटांच्या रस्त्यावर दिवाबत्तीची सुविधा पुरवण्यात येते. परंतु झोपडपट्टी परिसरातील अरुंद तसेच दाटीवाटीच्या दहा फुटांपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर दिवाबत्तीच्या सुविधा व्यवस्थेतून विद्युत पुरवठा करणे आणि घर मालाकांच्या परवानगीने त्यांच्या घरांच्या भींतीवर एलईडी दिवे बसवणे हे तेथील अरुंद व दाटीवाटीच्या रस्त्यांच्या आजुबाजुला राहणार्‍य रहिवाशांच्या विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य नसल्याचे मत महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाने स्पष्ट केले. तसेच दिवाबत्तीच्या सुविधेतून वीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि घरांच्या भिंतीवर कमी उंचीवर बसवण्यात आलेले दिवे हे सुद्धा चोरीला जाण्याची शक्यता जास्त असेल, त्यामुळेच ही बाब तांत्रिकदृष्टया व्यवहार्य वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ९ मीटरपेक्षा कमी रुंद असलेल्या आणि महापालिका दिवाबत्तीची सोय करू शकत नाही,अ शा रस्त्यांवर दिवाबत्तीची सुविधा व्यवस्थेमधून घरमालकांच्या परवानगीने त्यांच्या घरांच्या भिंतीवर एलईडी दिवे बसवण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे काही महिन्यांपूर्वी केली होती. मुंबईतील अनेक झोपडपट्टी डोंगराळ भागांमध्ये असून या परिसरांमध्ये रस्त्यांची रुंदी केवळ ३ ते ४ फुटच असल्यामुळे तेथे महापालिकेकडून दिवाबत्तीची सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्रिपाठी यांनी ही मागणी केली होती. परंतु महापालिका प्रशासनाने यावर नकारार्थी अभिप्राय दिल्याने नगरसेवकांची ही मागणी आता केराची टोपलीत गेली आहे.

हेही वाचा –

कुडाळ-माणगाव मार्गावर दुचाकींची धडक; दोघांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -