घरCORONA UPDATECORONA योद्ध्यांना महापालिकेने मध्यरात्री काढले हॉटेल बाहेर; MNS च्या दणक्याने मिळाला न्याय

CORONA योद्ध्यांना महापालिकेने मध्यरात्री काढले हॉटेल बाहेर; MNS च्या दणक्याने मिळाला न्याय

Subscribe

मुंबईतील सर्वात मोठे कोविड सेंटर असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमधील आयसीयूत कार्यरत असलेल्या परिचारिकांना वेतन न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले. तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था केलेल्या “द ललित“ या हाॅटेलमधून कोणतीही पूर्व सूचना न देता शनिवारी रात्री त्यांचे सामान बाहेर काढल्याचा प्रकार महापालिकेच्या कंत्राटदाराकडून करण्यात आला.

मुंबईतील सर्वात मोठे कोविड सेंटर असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमधील आयसीयूत कार्यरत असलेल्या परिचारिकांना वेतन न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले. तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था केलेल्या “द ललित“ या हाॅटेलमधून कोणतीही पूर्व सूचना न देता शनिवारी रात्री त्यांचे सामान बाहेर काढल्याचा प्रकार महापालिकेच्या कंत्राटदाराकडून करण्यात आला. याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेत तातडीने हालचाली करत बीकेसी कोविड सेंटरच्या अधिष्ठाता आणि कंत्राटदाराला याचा जाब विचारात त्यांना धारेवर धरले. मनसेच्या या कारवाईने कंत्राटदाराने नमते घेतले. यामध्ये काही परराज्यातीलही परिचारिकांचा समावेश होता. 

बीकेसी कोविड सेंटर फेज २ येथील आयसीयू डाॅ.शाहीद बरमारे यांच्या हेल्थ केअर कंपनीला महापालिकेमार्फत कंत्राटी पद्धतीत चालविण्यास दिले आहे. परंतु त्यांच्याकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ठाण्यातील एका कॅन्सलटंन्सी कंपनीला परिचारिका आणि वार्ड बाॅय पुरवण्याचे काम दिले होते. या कोविड सेंटरमध्ये मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यातील परिचारिका कामाला आहेत. तसेच राजस्थानमधील परिचारिकाही मोठ्या प्रमाणात कामाला आहेत. या सर्व परिचारिकांना शनिवारी कंत्राटदाराकडून महिन्याचे वेतन न देता अचानक कामावरून काढून टाकल्याचा निरोप त्यांच्या वरिष्ठ डॉक्टरांकडून देण्यात आला. तसेच त्या राहत असलेल्या “द ललित“  या हॉटेलमधूनही पालिकेच्या आदेशाने त्यांचे सामान मध्यरात्री बाहेर काढण्यात आले. परराज्यातील व महाराष्ट्र्रातील विविध जिल्ह्यातील या महिलांची मुंबईमध्ये राहण्याची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे या सर्व परिचारिका, परिचारक यांच्यावर रात्र रस्त्यावर काढण्याची वेळ आली. कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका आणि परिचारक यांना अशा प्रकारे दिलेल्या हीन वागणुकीची माहिती मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता आणि मनसे महापालिका कर्मचारी कामगार सेना सरचिटणीस अखिल चित्रे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या महिलांची भेट घेतली. त्यानंतर अखिल चित्रे यांनी बीकेसी कोविड सेंटर फेज २ च्या अधिष्ठाता यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच कंत्राटदारांना तातडीने हजर करण्याची मागणी लावून धारली. त्यानंतर कंत्राटदार हजर झाल्यानंतर त्यांना मनसे स्टाईलने दणका दिल्यानंतर कॅन्सलटंन्सी कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी परिचारिका, परिचर आणि कर्मचारी यांची माफी मागत काही तासांतच त्यांचे वेतन बँक खात्यात जमा केले. 
 
 
“काम खत्म, आदमी खत्म” या हिंदी चित्रपटातील डायलाॅगप्रमाणे मुंबई महापलिका कोरोना योद्धे असलेल्या परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी वागली आहे. वेतन न देता मध्यरात्री हॉटेलमधून बाहेर काढणे हा प्रकार निंदनीय आहे. यापुढे कोरोना योद्ध्यांसोबत आम्ही असले प्रकार खपवून घेणार नाही.
– अखिल चित्रे, सरचिटणीस, मनसे महापालिका कर्मचारी कामगार सेना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -