घरमुंबईबलिदान देणारेच खरे मानकरी

बलिदान देणारेच खरे मानकरी

Subscribe

मराठा आरक्षणाचा लढा हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात ४१ जणांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे हे शहीद मराठा आरक्षणाचे खरे मानकरी ठरले आहेत.उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून पहिले बलिदान दिले ते अण्णासाहेब पाटील यांनी. मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत अण्णासाहेब यांनी २३ मार्च १९८२ मध्ये मुंबईत पिस्तुलाने स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. २८ वर्षीय अण्णासाहेब हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंद्रुळ या गावचे रहिवासी होते. त्यावेळी खर्‍या अर्थाने मराठा आरक्षणाच्या मागणीला वाचा फुटली. पण राज्य सरकारांनी या मागणीकडे लक्ष दिले नाही. मात्र कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेनंतर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाची मागणी लावून धरली. या आरक्षणासाठी त्यानंतर तब्बल ३७ जणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

मुंबईत ९ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा झाला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या मोर्चेकर्‍यांच्या गाडीला औरंगाबाद, नाशिक रोडवर १० ऑगस्ट रोजी अपघात झाला. त्यात हर्षल अनिल घोलप, नारायण कृष्णा थोरात, अविनाश नवनाथ गव्हाणे, गौरव प्रजापती यांचा मृत्यू झाला. तसेच मोर्चाच्याच दिवशी म्हणजे ९ ऑगस्टला संध्याकाळी सहाच्या सुमारास परतत असताना अपघातात विनायक ढगे, विल्यम जोसेफ, सिद्धार्थ म्हसे, सिद्धार्थ चव्हाण यांचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला.या सर्वांच्या बलिदानामुळेच हे आरक्षण मिळाल्याची भावना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांमध्ये आहे. मराठा आरक्षण जाहीर झाल्यावर त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -