घरमुंबईलालबाग येथे जप्त केलेल्या मोबाईलचे मालक सापडेना

लालबाग येथे जप्त केलेल्या मोबाईलचे मालक सापडेना

Subscribe

मुंबई : माउंट मेरी जत्रा आणि गणेशोत्सवादरम्यान गावदेवी, लालबाग, काळाचौकी, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहीसर, मीरा रोड, विरार या ठिकाणांहून दहा लाखांचे मोबाईल चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे ५१ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले होते. ज्या लोकांचे हे मोबाईल आहेत ते त्यांच्याकडे पुन्हा पोहोचावेत म्हणून पोलिसांनी मोबाईलच्या नावासकट त्याचा महत्वाचा मानला जाणारा आयएमईआय नंबरसुद्धा जाहीर केला आहे.

या मोबाईलमध्ये सॅमसंग, विवो, रेडमी, अ‍ॅपल यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. ज्या लोकांचे हे मोबाईल आहेत ते त्यांच्याकडे पुन्हा पोहोचावेत म्हणून पोलिसांनी मोबाईलच्या नावासकट त्याचा महत्वाचा मानला जाणारा आयएमईआय नंबरसुद्धा जाहीर केला आहे. आरोपी विशाल महांतो हा खास चोरीच्या निमित्ताने झारखंडवरुन मुंबईत आला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्रसुद्धा होता. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या चोर्‍यामध्ये त्याने आतापर्यंत ५१ मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याने सदरची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात कलम 380 नुसार दाखल गुन्ह्याचा तपास करताना खबर्‍याने चोरट्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशालकुमार गंगा महतो (19) याला सापळा लावून कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक केली. सध्या हा आरोपी गावदेवी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे चोरीच्या आणखी काही प्रकरणांची उघड होण्याची शक्यता आहे. ही कारवाई परिमंडळ 12 चे उपायुक्त विनयकुमार राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -