घरमुंबईसैनिक गणवेशातील संशयिताला विधानभवनात अटक

सैनिक गणवेशातील संशयिताला विधानभवनात अटक

Subscribe

राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशन सुरु असताना भारतीय सैनिकांच्या वेशात असणार्‍या एकाने सोमवारी विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी वेळीच त्याला अडवून ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा गणवेश आणि ओळखपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी घडलेल्या या प्रकारामुळे विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

विधानभवनात प्रवेश करणार्‍या या इसमाचा उद्देश काय होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. कार्तिकेय प्रताप सिंह असे मारिन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना शुक्रवारी दुपारी सिंह हा भारतीय सैनिकांच्या परिधान करून त्याच्याजवळचे सैन्याचे ओळखपत्र दाखवून विधानभवनात प्रवेश करण्याच्या प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय येताच त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव कार्तिकेय प्रताप सिंह असे असून तो भारतीय सैनिक दलात कर्नल असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने भारतीय सैनिकांचे ओळखपत्र त्याने पोलिसांना दाखवले, मात्र त्यांच्याजवळील ओळखपत्र बोगस असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले.

- Advertisement -

पोलिसानी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम१७१प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. स्वतःला कर्नल असल्याचे सांगून त्याचा विधानभवन मध्ये या प्रकारे प्रवेश करण्याचा काय उद्देश होता या बाबत पोलीसानी गुप्तता पाळली आहे. मात्र हा गंभीर प्रकार असून विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचा घरात चोरी
मुंबई । केंद्रीय अवजड मंत्री अरविंद सावंत यांचे खासगी स्वीय सहाय्यक दीपक घोघल हे दिल्लीला असताना त्याच्या शिवडीतील राहत्या घरातून लाखो रुपयाची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ही चोरी मोलकरणीने केली असावी, असा संशय दीपक घोघल यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे.या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिपक रमेश घोघल हे केंद्रीय अवजड मंत्री अरविंद सावंत यांच्याकडे स्वीय सहाय्यक आहे.

- Advertisement -

शिवडीतील मिठीबाई इमारत या ठिकाणी राहणारे घोघल हे मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासोबत दिल्लीला गेले होते. २१ जून रोजी रात्री दीपक घोगल हे दिल्लीवरून परतले असता त्यांना घरातील बॅगेत ठेवलेले १ लाख ३० हजार रुपयांची रोकड मिळाली नाही. शनिवारी स्वीय सहायक दीपक घोघल यांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घोघल यांनी दुसर्‍या मोलकरीणवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत बनसोड यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -