घरमुंबईवीज मंडळाच्या कामगार अभियंत्यांचा तीन दिवसीय संप

वीज मंडळाच्या कामगार अभियंत्यांचा तीन दिवसीय संप

Subscribe

संपूर्ण महाराष्ट्रातील वीज मंडळांअंतर्गत वीज कंपन्यांमध्ये काम करणार्‍या तांत्रिक कामगार, अभियंते यांच्या कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व कामगार, अभियंते संपावर गेले असून भिवंडी तालुक्यातील पडघा येथे महापारेषण कंपनीच्या ५००, ४००, २२०, १००, २२ केव्ही क्षमतेच्या या सर्वात मोठ्या वीजपुरवठा केंद्रातील १०५ अभियंते कामगार या संपात सहभागी झाले आहेत. या विद्युत उपकेंद्रातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी (एमआयडीसी), रेल्वे, मुंबई जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा केला जात असून सतत तीन दिवसीय लाक्षणिक संपाच्या कार्यकाळात जर कोणताही बिघाड झाला, तर मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागण्याची शक्यता कर्मचारी, अभियंते यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील वीज मंडळाचे सुरुवातीच्या काळात तीन महामंडळात विभाजन करून त्यानंतरच्या काळात हळूहळू येथील कामगार भरती बंद करून या कंपन्यांतर्गत येणार्‍या विभागातील वीज वितरणाचे काम खासगी फ्रॅन्चायजीसकडे सोपवण्यात आला. त्यामुळे शासन पातळीवरून वीज मंडळाची वाटचाल आता खासगीकरणाच्या दिशेने सुरू आहे. नोकर कपात रद्द करून नोकर भरती सुरू करण्यात यावी, महानिर्मिती कंपनीच्याअधिकार क्षेत्रात कार्यरत लघु जलविद्युत निर्मिती केंद्र शासनाने अधिग्रहित करू नयेत, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, या आणि इतर मागण्यांकरिता महाराष्ट्रातील सहा कामगार तसेच अभियंता यांच्या संघटनांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. या संपात पडघा उपकेंद्रात १०५ कामगार अभियंते सहभागी झाल्याची माहिती शिवलिंग हुंडीवाले यांनी दिली आहे.

- Advertisement -

संपामध्ये या उपकेंद्रातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रेल्वे, मुंबई जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी विद्युत पुरवठा केला जात असून सध्या येथील काम सुरळीत सुरू असले तरी जर कोणता तांत्रिक बिघाड झाल्यास या ठिकाणी मोठा पेच निर्माण होऊ शकतो.
– राजेश अहिरे, संपात सहभागी कर्मचारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -