घरमुंबईजुन्या मोडी लिपीच्या डिजीडायझेशनचे काम प्रगतीथावर

जुन्या मोडी लिपीच्या डिजीडायझेशनचे काम प्रगतीथावर

Subscribe

दुर्मिळ होत असलेली मोडी लिपीचे पुनर्रुज्जीवन करण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले.

संत ज्ञानेश्वरांच्या काळापासूनच मराठी भाषा समृद्ध होती, असे उद्गार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मराठी भाषा गौरवदिनी बोलत होते. मराठी भाषेची पडझड होत असली तरी अजूनही भाषेची गौरवशाली परंपरा तितक्याच डौलाने जपली जात आहे. ही आनंदाची बाब आहे. दुर्मिळ होत असलेली मोडी लिपीचे पुनर्रुज्जीवन करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच जुन्या मोडी लिपीच्या डिजीडायझेशनचे काम प्रगतीथावर असल्याचे त्यांनी नमूद केले. ही कागदपत्रे संकेतस्थळावर मोडी लिपी वाचकांना भविष्यात उपलब्ध होतील.

मराठी दिनानिमित्त कार्यक्रम 

विद्यार्थी उत्कर्ष महामंडळ मुंबई संचालित सुवर्ण महोत्सवी समर्थ ग्रंथालय आयोजित मोडी लिपी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख प्रा. रामकृष्ण बुटे पाटील यांनी सांगितले की, मोडी लिपीतील अगणित कागदपत्रे आणि त्यात दडलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय घडामोडींवर आणि रहस्यावर प्रकाश पडून त्यातील गूढ बाहेर पडली तर पुढील शेकडो पिढ्यांना समर्थ ग्रंथालयाचे प्रमुख आणि शासनाचे निवृत्त उपसचिव शांताराम कुदळे यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याबद्दल माहिती दिली. तसेच वाचन संस्कृती जोपासण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मोडी लिपीच्या प्रशिक्षण केंद्राचे अरविंद कटकधोंडे यांनी कुसुमाग्रजांच्या आशयपूर्ण कवितांचे सादरीकण केले. याप्रसंगी कवि, लेखक राहुनाथ देशमुख यांनी मराठी भाषेविषयी कळवळ व्यक्त केली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांच्या ग्रंथायन ग्रंथ आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत फिरत्या ग्रंथालयाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवृत्त नायब तहसीलदार देशमुख यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -