घरमुंबईपालिका अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू

पालिका अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू

Subscribe

नवी मुंबई पालिका सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून श्रमिक सेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

लोकनेते गणेश नाईक संस्थापित कामगारांचे हित साधणारी कामगार संघटना ‘श्रमिक सेने’च्या पाठपुराव्याला यश आले असून या संघटनेच्या मागणीनुसार नवी मुंबई पालिका सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या नवी मुंबई पालिकेच्या महासभेत या विषयीचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे नवी मुंबई परिवहन सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच कंत्राटी, ठोक आणि रोजंदारी तत्वावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेतनवाढ देण्याची सूचना महापौर जयवंत सुतार यांनी दिली आहे.

एनएमएमटी कर्मचार्‍यांना लाभ

पालिका आणि एनएमएमटीतील सर्व संवर्गातील कामगारांसाठी सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा, अशी मागणी श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ. संजीव गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक सेनेच्या शिष्टमंडळाने १४ फेब्रुवारी रोजी महापौर जयवंत सुतार, पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, परिहवनचे व्यवस्थापक शिरिष आदरवड आणि पालिकेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन सादर करुन केली होती. त्यावेळेसच ही मागणी महापौर सुतार आणि आयुक्त रामास्वामी. एन यांनी मान्य केली होती. त्यानुसार १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने सातव्या वेतन आयोगाची अमलबजावणी पालिका करणार आहे. परिश्रमपूर्वक आपली सेवा देऊन नवी मुंबईच्या लौकीकात भर घालणार्‍या पालिका, एनएमएमटी मधील सर्व सवर्गातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना तसेच ठोक, कंत्राटी, रोजंदारी तत्वावरील सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबादला लोकनेते गणेश नाईक यांच्या कामगार हिताय धोरणानुसार आतापर्यंत श्रमिक सेनेने प्राप्त करून दिला आहे.

- Advertisement -

श्रमिक सेनेचे सरचिटणीस चरण जाधव आणि इतर पदाधिकार्‍यांनी महापौर सुतार आणि पालिका आयुक्त रामास्वामी एन यांची भेट घेवून सातवा वेतन आयोग लागू केल्याबददल त्यांचे आभार मानले आहे. महापालिका सेवेत सुमारे २ हजार २०० कायमस्वरुपी कर्मचारी असून सुमारे साडेसहा हजार कंत्राटी आणि ठोक कामगार आहेत. २०१६ पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतनासोबतच फरकाची रक्कमही कर्मचार्‍यांना मिळणार आहे. सध्याच्या वेतनावर ४० टक्के वाढ मिळणार आहे. अधिकार्‍यांच्या वेतनात ४० ते ५० टक्के वाढ होणार आहे. यापुढे वेतनापोटी पालिकेला २३० कोटीं ऐवजी ३२२ कोटी रुपये खर्च येणार आहे.


हेही वाचा – ठाणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून गणेश नाईक रिंगणात उतरणार!

- Advertisement -

हेही वाचा – गणेश नाईकांना लोकसभेसाठी उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनीती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -