घरमुंबईमनसेचा यंदाचा दीपोत्सव खूपच खास; सलीम-जावेद यांच्या हस्ते उद्घाटन तर विकी कौशलही...

मनसेचा यंदाचा दीपोत्सव खूपच खास; सलीम-जावेद यांच्या हस्ते उद्घाटन तर विकी कौशलही लावणार हजेरी

Subscribe

मनसेचा यंदाचा 'दीपोत्सव 2023' हा खूपच खास होणार आहे. या दीपोत्सवाचं उद्घाटन सलीम-जावेद यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे. शिवाजी पार्कात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोठे मोठे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

मुंबई: मनसेचा यंदाचा ‘दीपोत्सव 2023’ हा खूपच खास होणार आहे. या दीपोत्सवाचं उद्घाटन सलीम-जावेद यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे. शिवाजी पार्कात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोठे मोठे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. (This year s Deepotsav of MNS is very special Salim Javed will inaugurate and Vicky Kaushal will also attend)

मनसेच्या दीपोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन केलं जातं. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात. मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावं वर्ष आहे. हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता शिवाजी पार्कवर पार पडणार आहे.

- Advertisement -

राजकुमार हिरानी ते विकी कौशल यांची हजेरी

दीपोत्सव 2023 चा दुसरा दिवसही खास असणार आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी दीपोत्सवाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखर अभिजात जोशी, निर्माते ,साजिद नाडियादवाला, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेता विकी कौशल यांच्या हस्ते 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता उद्घाटन होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मनसेच्यावतीने दीपोत्सवाचं आयोजन केलं आहे. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातील रोषणाई, म्हणजेच दीपोत्सव हे गेल्या 11 वर्षांपासून होत आहे. शिवतीर्थावर तिथल्या रस्त्यांवर, झाडंवर रोषणाई करण्यात येत असते. मनसेच्या दीपोत्सवात मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारदेखील हजेरी लावत असतात. हा दीपोत्सव तुळसी विवाहापर्यंत सुरू असतो. मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दीपोत्सवाला हजेरी लावतात.

- Advertisement -

(हेही वाचा: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! शिंदे सरकार महागाई भत्त्यात करणार ‘इतकी’ वाढ )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -