घरमहाराष्ट्रनीरव मोदीसाठी आर्थर रोड कारागृहात बनविण्यात आली विशेष बॅरेक, पण...; संजय राऊतांचा...

नीरव मोदीसाठी आर्थर रोड कारागृहात बनविण्यात आली विशेष बॅरेक, पण…; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Subscribe

भारताची करोडे रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या नीरव मोदी याला ज्या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे, तिथे विशेष खोली तयार करण्यात आली आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती राऊत यांनी त्यांच्या सामनाच्या दिवाळी अंकात कसाबच्या यार्डात या सदरात लिहिली आहे.

मुंबई : तब्बल 14 हजार कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. तो सध्या ब्रिटनच्या तुरुंगात आहे. परंतु, नीरव मोदी याला भारतात आणल्यानंतर त्याला नेमके कोणत्या तुरुंगात ठेवण्यात येणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, याबाबतचा खुलासा ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. भारताची करोडे रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या नीरव मोदी याला ज्या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे, तिथे विशेष खोली तयार करण्यात आली आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती राऊत यांनी त्यांच्या सामनाच्या दिवाळी अंकात कसाबच्या यार्डात या सदरात लिहिली आहे. राऊतांनी या दिवाळी अंकामध्ये त्यांनी तुरुंगात घालवलेल्या दिवसांबाबत माहिती लिहिली आहे. (special barrack was made in Arthur Road Jail for Nirav Modi, Sanjay Raut’s sensational claim)

हेही वाचा – माळी समाजाचे आहात म्हणून…; प्रकाश आंबेडकरांचा मराठा आरक्षणप्रश्नी भुजबळांवर निशाणा

- Advertisement -

संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात अटक केल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. या तुरुंगात ते ज्या बॅरेकमध्ये होते, त्या बॅरेकच्याबाजूला आणखी एक खास बॅरेक तयार करण्यात आले होते. ते बॅरेक नीरव मोदीसाठी तयार करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबत सामनाच्या दिवाळी अंकात लिहिण्यात आले आहे की, “आर्थर रोड कारागृहात ज्या बॅरेक मध्ये होतो, त्याच्या बाजूला एक विशेष बॅरेक बनवण्यात आली होती. ही बॅरेक खास बनवून घेतली होती आणि त्याची रोज साफसफाई करुन व्हिडिओ चित्रीकरण केले जात होते. लंडनवरून एक पाहुणा आलाच तर त्याच्यासाठी ही वेगळी व्यवस्था असे सांगण्यात आले होते. त्या पाहुण्याचे नाव म्हणजे नीरव मोदी.”

नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे व आपल्याला मुंबईत पाठवू नये अशी मागणी त्याने कोर्टात केली. कारण भारतातील तुरुंग अमानवी स्वरूपाच्या आहेत. त्यामध्ये कमालीची अस्वच्छता व त्यांना जणू छळ छावण्याचे स्वरूप आहे. त्यामुळे मला लंडन तुरुंगातच ठेवा या याचिकेनंतर लंडन कोर्टाने आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून येथील तुरुंग व्यवस्थेचा अहवाल मागवला. त्यामध्ये मोदीसाठी निर्माण केलेल्या खास कोठडीचे चित्रण पाठवले. ही कोठडी प्रशस्त आहे. यामध्ये स्वतंत्र टीव्ही, बाथरूम आहे, पण ही व्यवस्था इतर कैद्यासाठी नाही. आर्थर रोडला बनवलेल्या कोठडीच्या बाजूच्या यार्डात मी आहे, नीरव मोदी आला तर आपल्याला कंपनी मिळत असे मला वाटले होते, अशी माहिती राऊतांनी दिवाळी अंकाच्या माध्यमातून दिली आहे.

- Advertisement -

राऊतांनी याशिवाय बरेचसे काही या दिवाळी अंकात लिहिले आहे. ‘कसाबच्या यार्डात’ या सदरमध्ये हे सर्व काही वाचकांना वाचता येणार आहे. त्याशिवाय संजय राऊत यांनी तुरुंगात घालवलेल्या 100 दिवसांबाबत देखील या सदरमध्ये लिहिले आहे. ते याबाबतचे पुस्तक देखील प्रकाशित करणार आहेत. याबाबतची दिवसांचा संपूर्ण अनुभव त्यांच्या पुस्तकातून वाचता येणार आहे. पंरतु, सामनाच्या दिवाळी अंकात नीरव मोदीसंदर्भात केलेल्या खळबळजनक खुलाश्यामुळे आणखी एक वाद रंगण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -