घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर...तर ओबीसी आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

…तर ओबीसी आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे रोज पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर भाष्य करत आहेत. पुरावे असून 40 वर्ष मराठ्यांचे वाटोळे झाले असा आरोप मनोज जरांगे यांनी केली. तसेच 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी केला. (Give reservation by December 24 or OBC will announce the name of anti reservation leaders Manoj Jarangs warning again​)

हेही वाचा – …म्हणून पुरावे असूनही 40 वर्षांपासून आरक्षण मिळत नव्हतं; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर आरोप

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, माझी तब्येत आता ठणठणीत होत आहे. मी दोन-तीन दिवसांनी कामाला सुरुवात करेल. सरकारकडून त्यांच्या पातळीवर प्रचंड जोराने काम सुरू आहे. मराठा समाजाला मी 29 ऑगस्टला शहापूरला शब्द दिला की, मराठ्याच्या पदरात प्रमाणपत्र पडतील. ते पडायला सुरुवात झाली आहे. सरकार काम करत आहे. नाराजी व्यक्त करायची म्हणून त्यावेळेस केली. पण आज पुर्ण ताकदीने सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यभर काम करत आहे. जिल्हा-जिल्ह्यात त्यांनी मराठा समाजाल प्रमाणपत्र देण्यासाठी कक्ष स्थापन केले आहेत. यामुळे लक्षात येत आहे की, ते आता दिरंगाई करत नाही आहेत. परंतु त्यांनी दिरंगाई केली तर आम्ही सावध आहोत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी दाखले मिळत आहेत. पण तरीही ओबीसी नेते विरोध करत आहेत. परंतु आम्हाला हक्काचं आरक्षण मिळायलाच हवं. पुरावे असून 40 वर्ष मराठ्यांचे वाटोळं झालं. पण आता आमचं आरक्षण आम्हाला मिळतं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही. ज्यांनी आमच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकायला हवं. सामान्य मराठ्यांचे वाटोळं करुन मराठा नेते मंत्री झाले. त्यामुळे आता आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळायला हव्यात. नाहीतर कुणी ओबीसी आरक्षण रोखलं त्याची यादी समोर आणणार. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार, अशा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – “बेकायदेशीर सरकारवर बुलडोजर फिरवण्याची आवश्यकता…”, मुंब्य्रातील घटनेने संजय राऊत संतापले

पुरावे सापडल्यामुळे आमचं आरक्षण सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता ज्या सुविधा ओबीसींना मिळतात त्या आम्हालाही मिळायला हव्यात. 40 वर्षानंतर आरक्षण मिळत असल्याने आम्ही आनंदी आहोत. आम्हाला आमच्या हक्काचं राजकीय आरक्षण हवं. आमच्याकडे नोंदी आहेत. मराठा आरक्षण मिळू नये हे काही नेत्यांना वाटतं. त्यामुळे त्यांनी मराठा ओबीसी होता याचे पुरावे लपवून ठेवले. आधी आम्हाला आरक्षण द्या, मग काय वाढवायचे आहे ते वाढवा. ओबीसी आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. मराठा नेत्यांचा नेमका विरोध कशाला? असा प्रश्न उपस्थित करत आमचं वाटोळे आमच्याच नेत्यांनी केलं, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -