घरमुंबईनक्षलवाद्यांच्या नावाने डॉक्टरकडून ५० लाखांची खंडणी; You Tube पाहून रचला कट आणि...

नक्षलवाद्यांच्या नावाने डॉक्टरकडून ५० लाखांची खंडणी; You Tube पाहून रचला कट आणि…

Subscribe

मुंबई गुन्हे शाखेकडून एक कारवाई करण्यात आली असून हा धक्कादायक प्रकार ऐकूण तुम्ही देखील हैरान व्हाल हे नक्की. एका महिला मुख्य आरोपीने यूट्यूब वर व्हिडीओ पाहून एक कट रचला होता. ज्यामध्ये या महिलेसह आणखी काही जणांनी नक्षलवाद्यांच्या नावाने एमबीबीएस डॉक्टरला धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. लाल सलाम नक्षली संघटनेच्या नावाने डॉक्टरला धमकावत या महिलेने ५० लाख रुपये मागितले होते. खंडणी न दिल्यास ऑपरेशन स्टार्ट अंतर्गत डॉक्टरच्या मुलाची हत्या आणि ऑपरेशन संपन्नच्या अंतर्गत शेवटी डॉक्टरची हत्या करण्याची धमकी दिली. मात्र या खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

असा घडला प्रकार

गोरेगाव येथील डॉक्टर वाडीलाल शहा यांना लाल सलाम या संघटनेच्या नावाने ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकारानंतर डॉक्टर शहा यांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. नक्षलवादी असल्याचे सांगत डॉक्टर शहा यांना एक धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवला असून या संदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचा तपास अखेर नवी मुंबई आणि विरारपर्यंत पोहोचला. ज्या ठिकाणी या प्रकरणातील आरोपी लपले होते. गुन्हे शाखेने आरोपी बैसाखी विश्वास या महिलेला घणसोली, वाशी येथून अटक केली. तर मोहम्मद हयात शहा याला गोरेगाव मधून अटक केली तर तिसरा आरोपी विक्रांत किरट याला विरार मधून गुन्हे शाखेने अटक केली. यूट्यूब वर व्हिडिओ पाहून यांच्या डोक्यात हा कट रचण्याचा प्लॅन आला. त्यानंतर यांनी गोरेगाव मधील डॉक्टर वाडीलाल शहा यांना लुटण्याचा प्लॅन केला आणि खंडणी उकळण्यासाठी एक ऑपरेशन सुद्धा राबवले जाईल अशी धमकी डॉक्टर वाडीलाल शहा यांना देण्यात आली होती. या ऑपरेशनचे नाव ऑपरेशन स्टार्ट आणि ऑपरेशन संपन्न असे असल्याचे सांगितले जात आहे.

या प्लानमधील मास्टर माईंड हयात होता. वाडीलाल शहा हे हयातचे फॅमिली डॉक्टर होते. वाडीलाल शहा यांची प्रॅक्टिस चांगलीच सुरु होती आणि त्यांना एकच मुलगा होता. ज्यामुळे हयातच्या डोक्यात हा प्लान आला. हयातने यासाठी त्याचा मित्र विक्रांत किरटला सोबत घेतलं आणि विक्रांतने आपली महिला मैत्रीण बैसाखीला या प्लॅनमध्ये सोबत घेतले. विक्रांतने पत्र लिहले तर बैसाखीने हे पत्र डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले होते.


भाजपातील त्या नेत्यांसाठी होते मुख्यमंत्र्यांचे संकेत – संजय राऊत
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -