घरताज्या घडामोडीअशा प्रकारच्या अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाही - अमरिंदर सिंह

अशा प्रकारच्या अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाही – अमरिंदर सिंह

Subscribe

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता शिगेला पोहोचला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह मुख्यमंत्रीपदासह काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक प्रयत्न करूनही कॅप्टन आणि त्यांचे कट्टर विरोधी नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. त्यामुळे आता यासर्व पार्श्वभूमीवर आज, शनिवारी संध्याकाळी ५ वाजता काँग्रेसने विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपले मत व्यक्त केले आहे. अशा प्रकारच्या अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाही, असे अमरिंदर सिंह यांनी सोनिया गांधींना सांगितले आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

दरम्यान अमरिंदर सिंह यांनी आपल्या समर्थक आमदारांची भेट घेऊन सुरू असलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर चर्चा केली. ४८ नाराज आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसने विधिमंडळ बैठक बोलावली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आमदारांच्या या बैठकीमुळे पंजाबमधील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलण्याची अटकळ वाढली आहे. यादरम्यान काँग्रेसच्या तीन नेत्यांच्या नावांची चर्चा जोरात सुरू आहे. पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख सुनील जाखड, प्रताप सिंह बाजवा आणि बेअंत सिंह यांचे नातू आणि खासदार रवनीत सिंह बिट्टू यांचा नावाचा यात समावेश आहे.

- Advertisement -

सुत्रांच्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना म्हटले की, ‘अशा प्रकारचा अपमान खूप झाला आहे. आता ही तिसरी वेळ आहे. मी अशा प्रकारच्या अपमानासोबत पक्षात राहू शकत नाही.’

गेल्या महिन्यात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरोधात ४ मंत्री आणि काही आमदारांनी नाराजीचा आवाज उठवला होता. आमदार म्हणाले होते की, अमरिंदर सिंह यांच्याकडे अपूर्ण आश्वासने पूर्ण करण्याची क्षमता आहे, यावर त्यांचा विश्वास नाही आहे. दरम्यान आता विधिमंडळाच्या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थिती राहण्यास बंधनकारक केले आहे. यामध्ये हरीश चौधरी आणि अजय माकन देखील उपस्थित असतील.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपातील त्या नेत्यांसाठी होते मुख्यमंत्र्यांचे संकेत – संजय राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -