घरदेश-विदेशआम्ही कधी 'एअर स्ट्राइक'चे राजकारण केले नाही - खर्गे

आम्ही कधी ‘एअर स्ट्राइक’चे राजकारण केले नाही – खर्गे

Subscribe

काँग्रेसच्या नेतृत्तवाखाली 'यूपीए'च्या दहा वर्षाच्या शासनकाळात १२ एअर स्ट्राइक करण्यात आले होते. परंतु, आम्ही कधी याचे राजकारण केले नाही, असा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.

भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एअर स्ट्राइक केले होते. या एअर स्ट्राइकची चर्चा देशभरात सुरु असतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तीन एअर स्ट्राइक केल्याचा दावा केल्याची घटना ताजी असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुद्धा १२ एअर स्ट्राइक केल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्तवाखाली ‘यूपीए’च्या दहा वर्षाच्या शासनकाळात १२ एअर स्ट्राइक करण्यात आले होते. परंतु, आम्ही कधी याचे राजकारण केले नाही, असे खर्गे म्हणाले आहेत.

केंद्र सरकारकडून शहिदांच्या मृतदेहाचे राजकारण

१४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने या हल्ल्याचे चोखप्रत्युत्तर देत जैशच्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने बॉम्ब वर्षाव करत दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. त्यानंतर ‘केंद्र सरकारकडून शहिदांच्या मृतदेहांचे राजकारण सुरु झाले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विकासाच्या नावावर सांगण्यासारखे काही नाही. एनएसएसओच्या अहवालाच्या माहितीनुसार, ३८ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर २७ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या. मात्र भाजपाने १० कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन होते. त्याचे काय झाले? असा सवाल मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे. हावेरीमध्ये पक्षाच्या रॅलीला संबोधित केल्यानंतर हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी तीन स्ट्राइक झाल्याचा दावा केला होता. मागील पाच वर्षात तीन वेळा सीमेच्या पलिकडे जावून भारतीय जवानांनी एअर स्ट्राइक केला आहे. दोन स्ट्राइकची माहिती मी देईन. परंतु तिसऱ्या स्ट्राइकबद्दल काहीही सांगणार नाही, असे राजनाथ यांनी म्हटले होते.


वाचा – Pulwama attack : पुलवामा भ्याड हल्ल्याची धमकी खरी ठरली!

- Advertisement -

वाचा – Kashmir terror attack: अफगाण युद्धातील दहशतवादी ‘पुलवामा’चा सूत्रधार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -