घरताज्या घडामोडीवसतीगृहाला २४ तासात दोन कोटींचा निधी देणार - धनंजय मुंडे

वसतीगृहाला २४ तासात दोन कोटींचा निधी देणार – धनंजय मुंडे

Subscribe

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी मंगळवारी वरळीच्या मागासवर्गीय वसतीगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मंगळवारी वरळी बी.डी.डी चाळ ११८ येथील मागासवर्गीय वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली आहे. या दोन्ही वसतीगृहाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याचं सांगितलं असून हा सर्व खर्च २४ तासांच्या आत केला जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. यावेळी त्यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जोपर्यंत नवीन वसतीगृह होणार नाही तोपर्यंत या दोन्ही वसतीगृहाची जबाबदारी ते स्वतः घेणार असल्याचं मुंडें यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

पुतळ्याची उंची नको तर विचारांची उंची वाढवा अशाप्रकारचे अर्ज मागासवर्गीय वसतीगृहातील विद्यार्थी सरकारकडे करत होते. वसतीगृह राहण्यासाठी योग्य असावी याकरिता गेल्या दोन दिवसांपासून शेकडो तरुण मंडळी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होते. त्यामुळे मंगळवारी धनंजय मुंडेंनी यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांची भेट घेतली.

- Advertisement -

यापूर्वी शिवसेना नेते सचिन भाऊ अहिर यांनी या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं होत.


हेही वाचा – सध्या भारतात मोडी लिपी नाही तर मोदी लिपी दिसते – राज ठाकरे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -