घरमुंबईथिएटरमध्ये जाऊनही मुख्यमंत्र्यांनी 'तान्हाजी' पाहिला नाही!

थिएटरमध्ये जाऊनही मुख्यमंत्र्यांनी ‘तान्हाजी’ पाहिला नाही!

Subscribe

नुकताच प्रदर्शित झालेल्या तानाजी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून, आता हा सिनेमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत बघणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी वाईल्ड मुंबई चित्रफीतीच्या शुभारंभ कार्यक्रमादरम्यान सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्लाझामध्ये अजय देवगण सोबत आणि पालिका कर्मचाऱ्यांसोबत तानाजी सिनेमा पाहतील अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. मात्र ‘मी आज नाही तर माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत नंतर तानाजी बघेन’, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महापालिका निर्मित वाईल्ड मुंबई चित्रफीतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वीरमाता जिजाबाई उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राचे सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मुंबईला निसर्गाचे सुंदर देणे लाभले आहे. पण आपण सगळे ते देणे विसरलो आहोत आणि चटईक्षेत्राच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे आता आपापली चटई पसरा’, असे सांगत निसर्ग जपण्याचे आवाहन केले. तसेच अजूनही वेळ गेलेली नाही. निसर्ग आपल्याला कसा जपतो हे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisement -

‘म्हणून मी पालिकेच्या कार्यक्रमाला येतो’

दरम्यान, ‘मुंबईत जन्मलेला मी पहिला मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून मी नेहमी पालिकेच्या कार्यक्रमाला आवर्जून येत असतो’, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, संपूर्ण मुंबई सांभाळणारी माझी टीम इथे असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही, तर आयुक्त प्रविणसिंह परदेशी हा जंगलवेडा माणूस असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपण वाईल्ड कर्नाटक, वाईल्ड मुंबई बघितल्याचे सांगत राजकारणात असल्याने रोज काही ना काही वाईल्ड बघतच असतो असे सांगितले. एवढेच नाही, तर ‘वाईल्ड मुंबईसाठी, दिवसरात्र काम करणाऱ्या मुंबईला पुढे नेऊया’ असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -