घरमुंबईभिवंडी शहरात खूनाचा थरार

भिवंडी शहरात खूनाचा थरार

Subscribe

भिवंडीमध्ये गेल्या २४ तासात दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत. एका तरुणाने प्रेम प्रकरणातून हत्या केल्याचे समोर आले असून एका मेहुण्याने क्षुल्लक वादावरून भावोजींचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गेल्या २४ तासांत भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी खूनाचे दोन प्रकार घडले आहेत. पडघ्या लगतच्या कुरुंद गावातील तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करून त्याला एका चाळीच्या छताच्या लोखंडी छताला रस्सीने टांगून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसऱ्या घटनेत तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगांव येथील केस कर्तनालयात काम करणाऱ्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक वाद होऊन भांडण झाल्याने भावोजींची हत्या केल्याची घटना घडली आहे.

नक्की काय घडले?

पडघ्या लगतच्या कुरुंद गावातील सागर सुरेश पठारे (वय २७) या तरुणाचा मृतदेह कुरुंदच्या दाता, आदिवासीवाडी येथे साईनाथ भोईर यांच्या निवासी चाळीच्या छताच्या लोखंडी अँगला गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. सागर काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण करून घरातून निघाला होता. तो आदिवासी वाडी येथील गणपती मंडळाच्या येथे गेला असावा असे कुटुंबियांना वाटले होते. मात्र, त्याच्या गळफास घेतल्याच्या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांना धक्काच बसला.

- Advertisement -

हेही वाचाभिवंडीत महिलेवर सामूहिक बलात्कार करून नराधमांनी केला खून

प्रेम प्रकरणामुळे हत्या झाल्याचा आरोप

त्याचे येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली असावी, असा आरोप मृत सागर याच्या कुटुंबियांनी केला आहे. पडघा पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मुंबईच्या जे.जे रुग्णालयात पाठवला असून तेथील वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

क्षुल्लक वादावरून मेहुण्याने केला भावोजींचा खून

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगांव येथील केशकर्तनालयात काम करणाऱ्या सख्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक वाद झाल्याने या वादातून मेहुण्याने सख्या भावोजींची धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली आहे. अमिन जलील शेख (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे धामणगांव येथे ए-वन केस कर्तनालय नावाचे दुकान असून त्या दुकानात अरमान सलीम शेख (वय३०) हा देखील मृतासोबत काम करीत होता.

हेही वाचाKurla Murder Update: जेवण बनवलं नाही म्हणून केला खून

दारू पिण्यास नकार दिला म्हणून…

मात्र, अरमान यास दारू आणि नशेचे पदार्थ पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे अमिन त्याला विरोध करून नशा करण्यास मनाई करायचा. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले. यावेळी अरमान याने रागाच्या भरात आपला मेहुणा अमिन याच्या डोक्यात धारदार वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला आहे. या घटनेचा तालुका पोलीस ठाण्यात अरमान याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्यास सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे करीत आहे.

हेही वाचाअल्पवयीन विद्यार्थिनीचा मानसिक छळ करणाऱ्या शिक्षकाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -