घरमुंबईभिवंडीत महिलेवर सामूहिक बलात्कार करून नराधमांनी केला खून

भिवंडीत महिलेवर सामूहिक बलात्कार करून नराधमांनी केला खून

Subscribe

कामावरून घरी जात असलेल्या महिलेवर भिवंडीत सामूहिक बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात हादरून गेला आहे.

भिवंडी तालुक्यात महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे भिवंडी तालुका हादरून गेला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा) येथील कामगार महिलेवर सामूहिक बलात्कार करून साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खूनी आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

नक्की काय घडलं?

गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा ) येथील महिला प्रिती दिलीप भावर ( २९ ) ही अन्य महिलांसोबत वालीव तालुका वसई येथे कामावर जात होती. ती रविवारी सायंकाळी एसटी बसने महाळुंगे बस स्टॉपवर उतरली. त्यानंतर ती घरगुती सामान खरेदी करण्यासाठी दुकानात गेली. सामान घेऊन झाल्यानंतर प्रिती घराच्या दिशेने निघाली होती. राहत्या घरी जाण्यासाठी झाडाझुडपातून जावे लागत असल्याने ती एकटीच रस्त्याने जात असताना अचानक तिची गाठ नराधमांसोबत पडली. तिला दोघा नराधमांनी उचलून निर्जनस्थळी झाडाझुडपात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर तिचा साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली.

- Advertisement -

हेही वाचावृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या मोलकरणीला अटक

पतीने पुढे जाऊन पाहिले तर….

रात्री उशिरापर्यंत प्रिती घरी परतली नाही. त्यावेळी पती दिलीप याने तिची चौकशी वहिनीकडे केली. त्यावेळी ती अन्य महिलांच्या पुढे घरी निघाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी दिलीप महाळुंगे नाक्याकडे निघाला आणि त्याने पत्नी प्रिती हिच्याबाबत चौकशी केली. त्यावेळी दुकानदाराने प्रिती साडेसात वाजेल्याच्या सुमारास दुकानातून सामान घेऊन निघाल्याचे सांगितले. त्यावेळी भयभीत झालेल्या दिलीप याने रस्त्याने पायपीट करीत पत्नी प्रिती हिचा शोध घेतला. त्यावेळी बंधाऱ्याच्या अलीकडेली रस्त्याच्या कडेला प्रितीची छत्री आणि हातरुमाल पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने अधिक पुढे जाऊन पाहिले असता पत्नीच्या अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत ती निपचित पडल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -

साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी सुरु

पत्नीची अवस्था पाहून त्याने हंबरडाच फोडला आणि तात्काळ याची माहिती पाड्यातील नागरिकांना दिली. या घटनेबाबत तात्काळ गणेशपुरी पोलीस ठाण्यात कळवण्यात येताच अंबाडी पोलीस उपअधिक्षक दिलीप गोडबोले, पोलीस ठाण्याचे इंचार्ज महेश सगडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या संतप्त घटनेचे पडसाद परिसरात उमटताच श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगिता भोमटे, जया पारधी आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात एकच गर्दी करून खूनी आणि बलात्कार करणाऱ्या नराधामांना तात्काळ अटक करा अशी मागणी लावून धरली. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेशपुरी पोलिसांनी नितीन नारायण भोसले आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

हेही वाचामहिलेचा ऑनलाईन विनयभंग, विकृताला अटक

१८ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात येणार

या घटनेचा गणेशपुरी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय महेश सगडे करीत आहे. या अमानूष घटनेतील दोषींवर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या महिला आघाडीच्यावतीने १८ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली आहे.

हेही वाचातीन किलो गांजासह गावठी पिस्तुल जप्त; दोघांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -