घरमुंबईतंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर टार-निकोटीन प्रमाणाची नोंद नाही

तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर टार-निकोटीन प्रमाणाची नोंद नाही

Subscribe

तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर अद्यापही टार आणि निकोटीन प्रमाणाची नोंद होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर अद्यापही टार आणि निकोटीन प्रमाणाची नोंद होत नसल्याने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यालाच तिलांजली देण्यात आली असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. कर्करोगाला कारणीभूत असलेल्या या दोन्ही पदार्थांच्या प्रमाणाचा उल्लेख प्रत्येक पाकिटावर करण्यात यावा, अशी मागणी सध्या पुढे येत आहे. धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर धूम्रपानामुळे उद्भवणाऱ्या कर्करोगाचा उल्लेख आणि संबंधित फोटो छापले जातात. तशी सूचना छापणे कायद्याने बंधनकारक आहे. पण, त्याच सोबत पाकिटातील तंबाखू पदार्थांमध्ये निकोटीन आणि टार या दोन्हीच्या प्रमाणाचा उल्लेख करणे देखील कायद्याने बंधनकारक आहे. पण, ते प्रमाण छापले जात नाही.

सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यालाच तिलांजली

२००३ च्या कायद्यानुसार तंबाखुजन्य पदार्थांचा प्रतिबधांत्मक संदेश पाकिटावर छापण्यात सुरुवात करण्यात आली. या कायद्यातच निकोटीन आणि टार पदार्थांचा प्रमाण लिहावे, असे नियोजित होते. पण, त्याची अंमलबजावणी होत नव्हती.

- Advertisement -

देशातील तीन प्रयोगशाळा टार-निकोटीनचे प्रमाण सांगणार

५ सप्टेंबर २०१९ रोजी सरकारने मुंबई, उत्तर प्रदेश आणि आसाम इथल्या तीन प्रयोगशाळांना तंबाखुजन्य पदार्थांमधील टार-निकोटीनचे प्रमाण सांगण्याचे आदेश दिले आहेत. त्याआधी तंबाखुजन्य पदार्थांमधील टार-निकोटीनचे प्रमाण सांगणारी प्रयोगशाळा नसल्याने त्याचा गैरफायदा तंबाखुजन्य पदार्थ उत्पादक घेत होते.

तंबाखुजन्य पदार्थांमधील टार आणि निकोटीनचे प्रमाण सांगणारी प्रयोगशाळेचा प्रश्न सुटला आहे. गेल्या १४ वर्षांच्या प्रयत्नानंतर हा प्रश्न सुटल्याने सरकारने तंबाखुजन्य पदार्थांच्या पाकिटांवर टार-निकोटीनचे प्रमाण छापण्याची सक्ती उत्पादकांना त्वरीत करावी. – अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर्स असोसिएशन

- Advertisement -

हेही वाचा – तंबाखूजन्य पदार्थांवरील कारवाईचा अहवाल द्या


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -