घरमुंबईविरोध असला तरी निवडणूक लढवणारच

विरोध असला तरी निवडणूक लढवणारच

Subscribe

उदयनराजे भोसले यांची घोषणा साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याचा विरोध

मुंबई : साताराच्या लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत आतापासूनच जोरबैठका सुरू झाल्या आहेत. विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास पक्षातील रामराजे निंबाळकर गटाने जोरदार विरोध दर्शवला आहे. मात्र या विरोधाला न जुमानता आपण सातारातूनच निवडणूक लढणार अशी ललकारी उदयराजेंनी दिली आहे. यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीत वादाचा उगम झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघनिहाय आढावा बैठका रविवारी सुरू होत्या. काल सातारा लोकसभा मतदारसंघाची चर्चा होती. २०१४च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून विजयी झालेले खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीविषयी चर्चा सुरू असताना निंबाळकर गटाने त्यांच्या उमेदवारीला उघड विरोध केल्याचे सांगण्यात येते.

उदयनराजे यांच्याऐवजी श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिली जावी, अशी मागणी रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे यांनी केल्याचे सांगण्यात आले. राजेंविरोधातील चर्चा सुरू असताना बैठकीला उदयनराजे पोहोचले आणि आणि बैठकीतला नूरच बदलल्याचे कळते. ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे यायला उशीर झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. बैठकीतील विरोधाचा संदर्भ त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्वत:च मला उमेदवारी द्यायचा निर्णय झाला किंवा नाही झाला तरी मी सातार्‍यातूनच निवडणूक लढवणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगताच बैठकीत शांतता पसरली.

- Advertisement -

आपल्या उमेदवारीला अनेकजण विरोध करत असले तरी समर्थकही आहेत, हे लक्षात घ्या, असे राजे म्हणाल्याचे सांगतात. पवार साहेबांनी मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल, पण साहेबांचे अन्य पक्षात मित्र आहेत, तसेच अन्य पक्षात ही माझेही मित्र आहेत, असे सूचक वक्तव्य बैठकीत उदयनराजेंनी केल्यचे म्हटले.
माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विजयसिंह मोहितेपाटील यांच्या बरोबरच रामराजे निंबाळकर, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही दावा केला आहे. यामुळे या मतदारसंघातही उमेदवारीसाठी चढाओढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत दोन जागा हव्यात

मुंबईत फारसे अस्तित्व नसलेल्या राष्ट्रवादीला या शहरात दोन जागा हव्या आहेत. यासाठी काँग्रेसकडे आग्रह धरला जाणार आहे. याशिवाय आणखी एका जागेची मागणी करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. ईशान्य मुंबई बरोबरच उत्तरमध्य मुंबई किंवा उत्तर पश्चिम मुंबई यापैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. काँग्रेसकडून उत्तर पश्चिम या मतदारसंघातून गुरुदास कामात होते. तर उत्तरमध्य या मतदारसंघातून प्रिया दत्त गेल्यावेळच्या उमेदवार होत्या. या दोन्ही जागा परंपरागत काँग्रेसकडे आहेत.

- Advertisement -

सुप्रिया सुळे चिडल्या

उदयन राजे यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंकडे विचारणा करताच सुळे भडकल्या. या बातम्या जाणीव पूर्वक पेरल्या जात आहेत. असा कोणताही विरोध झालेला नाही. या सगळ्या कपोलकल्पित बातम्या आहेत. उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध असल्याच्या बातमीचे सुप्रिया सुळेनी खंडन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -