घरमुंबईकल्‍याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

कल्‍याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

Subscribe

कल्‍याण डोंबिवली महापालिकेच्‍या हद्दीतील अनधिकृत बांधकामावर आज धडक कारवाई करण्यात आली असून डोंबिवलीतील ४० राहिवाश्यांची अतिधोकादायक इमारत करण्यात आली आहे.

कल्‍याण डोंबिवली महापालिकेच्‍या हद्दीतील अनधिकृत बांधकामावर आज धडक कारवाई करण्यात आली आहे. कल्‍याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत अटाळी आणि इंदिरा नगर येथील अनधिकृत बांधकामावर गुरुवारी प्रभागक्षेत्र अधिकारी यांचे मार्फत कारवाई करण्‍यात आली आहे. अटाळी येथील बैठ्या चाळीतील सात घरांवर आणि इंदिरा नगर येथील दोन घरांवर तसेच अनधिकृतपणे उभारण्‍यात आलेल्‍या चार घरांवर धडक कारवाई करत अनधिकृत बांधकाम जमिनदोस्‍त करण्‍यात आले आहे.

या ठिकाणी करण्यात आली धडक कारवाई

डोंबिवली पूर्व येथील ग प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत संगीतावाडी येथील साईसदन इमारत क्रमांक १,२ आणि ३ ही अतिधोकादायक झाल्‍याने ती निष्‍कासित कारण्यास सुरुवात केली आहे. सदर इमारतीमध्‍ये ४० रहिवासी राहत होते. रहिवाश्‍यांनी इमारत खाली केल्‍यानंतर तीच्‍या निष्‍कासनाची कारवाई प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप आणि दिपक शिंदे यांचे पर्यवेक्षण आणि नियंत्रणाखाली सुरु करण्‍यात आली आहे. या कारवाई दरम्‍यान, २५ पोलीस आणि महापालिकेचे ४० कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील ९४,८५१ अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी; मात्र ५४६१ बांधकामावरच कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -